आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपना चौधरीच्या कार्यक्रमात मंडप कोसळल्याने उडाला गोंधळ: गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज ,एकाचा जागीच मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेगुसराय- हरियाणाची प्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरी हीचे  नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. व्यवस्थापनामार्फत ३५००० दर्शकांचीच व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.  परंतु ऐनवेळी 1.5 लाखांहून अधिक लोक नृत्य पाहण्यासाठी याठिकाणी आल्याने नियोजन कोलमडले. हा कार्यक्रम बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील बेचवाडा येथे ठेवण्यात आला होता. गर्दी जास्त वाढल्याने काही तरुण मंडळी मंडपासाठी उभारण्यात आलेल्या खांबांवर चढून कार्यक्रम बघत होते. खांबांवर भार वाढल्याने मंडपाचा खांब निसटला आणि मंडप पूर्णपणे खाली पडला. मंडप कोसळताच घाबरून लोकांची धावपळ सुरु झाली .गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला.  

 

> छट महोत्सवानिमित्त केले होते कार्यक्रमाचे आयोजन...
बछवाडा येथे दोन दिवसीय छट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने बॉलीवूडचे प्रसिद्ध पार्शवगायक हंस राज, सपना चौधरी यांसह अनेक कलाकारांना कार्यक्रमांसाठी अमंत्रित केले होते. आयोजकांना जास्तीत जास्त ३० ते ३५ हजार प्रेक्षक येण्याचा अंदाज होता त्याप्रमाणे त्यांनी नियोजन देखील केले. हंसराज व अन्य कलाकारांनी जेंव्हा सादरीकरण केले तेंव्हा शांततेत लोकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. परंतु जसजशी रात्र होत होती तसतशी गर्दी देखील वाढू लागली. 

 

> सपना चौधरीने नृत्य करण्यास सुरवात केलि तोच कोसळला मंडप...

सपना चौधरी येणार असे कळताच बेपूसराय आणि आसपासच्या जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने जमा होत होते.
-  सपना चौधरी व्यासपीठावर येताच जवळपास 1 लाखांहून अधिक लोक जमा झाले होते.गर्दीमुळे काही लोक मिळेल त्याठिकाणी उभे राहून कार्यक्रम पाहत होते. काहीजण व्यासपीठामागे उभे होते. आयोजक त्यांना वारंवार तेथे उभे न राहण्याबाबद विनंती देखील करत होते.
- तर काही अतिउत्साही तरुणमंडळी तर मंडपासाठी उभारण्यात आलेल्या खांबांवर चढून कार्यक्रम पाहत होते. रात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास  खांबांना  भार सहन न झाल्याने अचानक खांब निसटला. खांब निसटताच संपूर्ण मंडप देखील त्याबरोबर कोसळला
- अचानक मंडप कोसळल्याने घाबरून लोकांची धावपळ सुरु झाली, ही धावपळ पाहून आयोजकांनी कार्यक्रम तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला. 

 

बातम्या आणखी आहेत...