आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरकाहूनही वाईट आहे येथील लोकांचे जीवन, उपचाराच्या नावाखाली साखळीने बांधून करतात मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाली - इंडोनेशियाच्या बालीमध्ये एक अशी जागा आहे जी नरकापेक्षाही वाईट आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मानसिक रुग्णांबरोबर येथे प्राण्यांसारखे वर्तन केले जाते. अशा रुग्णांना येथे तुरुंगात कैद करून ठेवले जाते. त्यांना कोणाला भेटूहू दिले जात नाही. पीडितांना अशाप्रकारे टॉर्चर केले जाते की, पाहणाऱ्यांचाही थरकाप उडतो. अनेक दिवसांपासून याठिकाणाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानंतर काही एनजीओंनी मिळून या हॉस्पिटलमधील मानसिक रुग्णांना वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. 


अँड्रेया स्टार रीसी नावाच्या एका अमेरिकन फोटोग्राफरने 2011-12 मध्ये इंडोनेशियाच्या एका वेड्यांच्या हॉस्पिटलवर रिसर्च केला. त्यावेळी ही बाब समोर आली होती. त्यांनी याठिकाणी एक डॉक्युमेंट्री बनवून ही भयावह स्थिती जगासमोर आणली. या रिसर्चचे नाव त्यांनी डिसऑर्डर टेवले. अँड्रेया यांनी काही असे फोटोग्राफ घेतले जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही अंदाज लावू शकता की, येथील रुग्णांचे जीवन किती कठीण असेल. 


प्राण्यांप्रमाणे बांधून ठेवतात हात-पाय 
येथे मानसिक रुग्णांना साखळीने बांधून ठेवले जाते. अनेक पीडितांचे हात पायही वजनाखाली दाबून ठेवले जातात. अनेक महिने एका खोलीत बंद करून ठेवले जाते. तेथे खिडकीही नसते. त्यामुळे त्यांनी अनेक गंभीर आजार जडतात. 


अनेक रुग्ण विवस्त्र फिरतात 
येथे मेंटल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना गरजेचे असणारे काहीही सामान नाही. रुग्णांकडे परिधान करायला कपडेही नसतात. थंडी असो की गरमी येथील अनेक रुग्ण विवस्त्र फिरत असतात. त्यात अनेक महिलाही असतात.  


अनेक दिवस ठेवतात उपाशी 
रुग्णालयात रुग्णांना कधी खायला दिले जाते तर अनेकदा त्यांना उपाशी ठेवले जाते. हॉस्पिटल स्टाफने एकदा स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यांना बरे करण्यासाठी असे केले जाते. 

वेडे असणे हा शाप 
इंडोनेशियामध्ये मानसिक आजार किंवा वेडे असणे हा शाप असल्याचे समजले जाते. असा लोकांना येथे पासूंग म्हणतात. पासूंग हा एक इंडोनेशियन शब्द आहे. त्याचा अर्थ असतो, विक्षिप्त किंवा खालच्या स्तरावरील लोक. पण हा शब्द 1977 मध्ये बॅन करण्यात आला. 

 

एनजीओंचा पुढाकार 
या रुग्णांच्या मदतीसाठी आता अनेक सेवाभावी संस्था पुढे येत आहेत. अशा लोकांना बरे करण्यासाठी एक खास उपचार पद्धती दिली जाते. त्यात हर्बल ड्रिंक पाजणे, प्रार्थना करून घेणे, उलटी करायला लावणे, काही कास इंजेक्शनही दिले जातात. 

बातम्या आणखी आहेत...