आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo: बॉलिवूडचा प्रत्येक स्टार म्हणतोय सेक्शुअल हरॅसमेंट चुकीचे आहे, पण चित्रपट तर काही वेगळेच शिकवतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा ही सेक्शुअल हरॅसमेंटबद्दल होत आहे. दिग्दर्शक सुभाष कपूरवर लागलेल्या आरोपांनंतर आमिर खानने त्यांचा 'मुगल' हा चित्रपट सोडला आहे. पण ज्या वाईट प्रवृत्तीवरुन इंडस्ट्रीत चर्चा सुरु आहे, त्याच इंडस्ट्रीत तयार होणा-या चित्रपटांमध्ये सेक्शुअल हरॅसमेंटची मदत ही एंटरटेन्मेंटसाठी घेतली जाते. चित्रपटांमध्ये हीरोची सहजा पॉझिटिव्ह इमेज दाखवली जाते. पण त्यांच्यावर चित्रीत झालेले काही सीन्स हे क्रीप बिहेव्हिअरला प्रोत्साहन देणारे ठरतात. म्हणजेच या सीन्समध्ये छेडछाड आणि बलात्कारासारखे क्राइम हे सकारात्मकरित्या दाखवले जाते. अगदी सुरुवातीपासून चित्रपटांमध्ये असे होत आले आहे. राज कपूर यांच्या गाजलेल्या 'बोल राधा बोल संगम होगा कि नहीं..' या गाण्यात राधा संपूर्ण गाण्यात त्यांना नाही म्हणत असते, पण अखेरीस ती राज कपूर यांच्या हट्टापुढे हार मानते आणि त्यांना होकार देते. अर्थातच मुलीचा नकार हा होकारच असतो, असा संदेश अनेक चित्रपट देत असतात. आजही चित्रपटांमध्ये असेच दाखवले जाते. सुरुवातीला हीरो तिला त्रास देतो आणि नंतर ती त्याला होकार देते. 'बाहुबली : द बिगिनिंग' (2015) (2015) या बिग बजेट चित्रपटातही काहीसे असेच दाखवण्यात आले होते. 


'बाहुबली'च्या इंटीमेट सीनवरुन निर्माण झाला होता गोंधळ.. 
बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरलेला 'बाहुबली' या चित्रपटाला वादाची किनार आहे. यातील एका सीनवरुन काही सोशलाइट्सने नाराजीचा सूर आवळला होता. चित्रपटातील एका गाण्यात हीरो शिवाडू, हीरोईन अवंतिकाच्या मागे लागतो. सुरुवातीला तो बळजबरीने तिच्या कपड्यांशी छेडछाड करतो आणि नंतर तिचा मेकअप करतो. मात्र सोशलाइट्स म्हणाले होते, की अशा प्रकारचे चित्रपट ईव टीजिंगला प्रोत्साहन देतात आणि मुलींची इमेज मलिन करतात. कारण सिनेमात शिवाडू असे करुन अवंतिकाला त्याच्या प्रेमात पाडतो आणि नंतर तो अवंतिकासोबत इंटीमेट होतो. काही लोकांनी तर या सीनची तुलना बलात्काराशी केली होती. पण एवढी कॉन्ट्रोव्हर्सी होऊनदेखील सिनेमातील हा सीन डिलीट करण्यात आला नव्हता.

 

पुढील स्लाईड्सवर नजर टाकुयात, चित्रपटातील अशाच काही सीन्सवर...

बातम्या आणखी आहेत...