Home | National | Madhya Pradesh | School boy who fell from auto, bus runs over him is alive miraculously

शॉकिंग CCTV: ऑटोतून बाहेर पडला 6 वर्षांचा मुलगा, त्याचवेळी मागून आली भरधाव बस; मग घडला चमत्कार...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 10:49 AM IST

देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते. त्याचीच प्रचिती मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात आली आहे.

  • School boy who fell from auto, bus runs over him is alive miraculously

    सागर - देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते. त्याचीच प्रचिती मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात आली आहे. शहरात एका धावत्या ऑटोरिक्शातून अचानक अवघ्या 6 वर्षांचा मुलगा बाहेर पडला. रस्त्यावर पडताच मागून एक भरधाव बस आली. ही बस त्या मुलाच्या अंगावरून निघून गेली तेव्हा पाहणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठेका चुकला. मग यानंतर जे घडले त्यावर लोकांना विश्वास बसत नव्हता. तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने या घटनेला चमत्कार म्हटले आहे.


    ही घटना कटरा बाजार परिसरात 4 सप्टेंबर रोजी घडली. येथे 6 वर्षांचा मुलगा केंद्रीय शाळेतून दुपारी 2 वाजेच्या सुमारास घराच्या दिशेने ऑटोरिक्शामध्ये निघाला होता. त्याच ऑटोमध्ये दुसरे प्रवाशी देखील बसले होते. घाई गर्दीत ऑटो चालकाने आपल्या समोर असलेली स्कूल बस ओव्हरटेक करून निघण्याचा प्रयत्न केला. त्या गडबडीत ऑटो तिरकस केला असता लहान मुलगा बाहेर पडला. यानंतर वेळीच मागून भरधाव बस आली आणि त्या मुलावरून निघाली. परंतु, त्या मुलाला फक्त काही किर्कोळ जखमा झाल्या. मुलगा प्रचंड घाबरला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच ऑटो चालकाला बेजबाबदार गाडी चालवून लोकांचे जीव धोक्यात टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Trending