आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात, 20 विद्यार्थी जखमी; ब्रेक निकामी झाल्याने बस उलटली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- उतारावर ब्रेक निकामी झाल्याने बस उलटून पोद्दार इंटरनॅशनल या शाळेचे 20 विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात कात्रज देहूरोड बाह्य महामार्गाजवळ बुधवारी झाला. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

कात्रज देहूरोड महामार्गालगत आंबेगाव बुद्रुक परिसरात पोद्दार इंटरनॅशन शाळा आहे. या शाळेत पहिली ते चौथीत शिकणाऱ्या 25 ते 30 विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारी स्कूलबस शाळेत घेऊन येत  होती. काजत्रहून नऱ्हेच्या दिशेने येत असताना   बाह्यवळण रस्त्यावरील  उतारावर बसचे ब्रेक निकामी झाले. याच वेळी समोरून दुचाकीवरून एक महिला येत असल्याने बसचालकाने प्रसंगावधान राखून बस डाव्या बाजूच्या दगडावर चढविली. त्यामुळे बस रस्त्यावर उजव्या बाजूला उलटली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...