आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूलबसमध्ये टिचर, इतर मुले असतानाही कंडक्टरने चिमुरडीबरोबर केले हे कृत्य.. सूज पाहून आईला समजले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - अयोध्या नगर येथील सागर इंटरनॅशनल स्कूलच्या नर्सरी वर्गातील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. स्कूलबसच्या कंडक्टरने महिला केअर टेकर आणि इतर मुलांच्या उपस्थितीत हा प्रकार केल्याचे समोर येत आहे. गुरुवारी दुपारी घरी आल्यानंतर मुलीने आईला वेदना होत असल्याचे सांगितले. व्हॅनमधील अंकलने हे केल्याचेही तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कंटक्टरला ताब्यात घेतले. आरोपी अल्पवयीन आहे. 


कपडे बजलताना आईला दिसली सूज 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तीन वर्षांच्या चिमुरडीला याच वर्षी शाळेत टाकण्यात आले होते. ती रोज मिनी बसमधून शाळेत जायची. गुरुवारी दुपारी सुमारे दीड वाजता ती घरी परतली. चिमुरडीचे कपडे बदलताना आईला तिच्या शरिरावर सूज जाणवली. त्याबाबत विचारले तेव्हा मुलीने म्हटले की, व्हॅनमधील अंकलने असे केले आहे. खूप वेदना होत असल्याचे तिने सांगितले. 


आरोपीचे वय 17 वर्षे 
महिलेने पती आणि दीराला ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी कंडक्टरला ताब्यात घेतले आहे. त्याने वय 17 वर्षे सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या मेडिकलबरोबरच कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. 


महिला केअर टेकरच्या उपस्थितीतील प्रकार 
मुलीच्या काकाने सांगितले की, चांगली शाळा, क्लासरूम, टीचर्स, बसमध्ये महिला केअरटेकर अशी सर्व व्यवस्था पाहूनच या शाळेत मुलीला टाकले होते. गुरुवारी सकाळी मिनीबसमध्ये केअरट टेकर नव्हती. बस घरी परत आली तेव्हा महिला केअरटेकर होती. तरीही इतर मुलांच्या आणि केअर टेकरच्या उपस्थितीत आरोपीने हे कृत्य केले. 


सकाळी झाला उशीर 
शाळेतील शिक्षिका मानसी चतुर्वेदी म्हणाल्या की, गुरुवारी सकाळी उशीर झाल्याने मी स्कूलबसमध्ये जाऊ शकले नाही. शाळा सुटल्यानंतर मी याच बसमध्ये महिला केअरटेकर म्हणून आले होते. मी ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलली होती. कंडक्टरने असे केल्याची मला कल्पनाच नव्हती. मी रोज दुसऱ्या बसने येत जात असते. 


17 वर्षांचा कंडक्टर कसा ठेवला, प्रिंसिपलला देता आले नाही उत्तर 
कंडक्टर 17 वर्षांचा असेल तर त्याला स्कूल बसवर कसे काम दिले या प्रश्नावर शाळेच्या प्रिन्सिपल उत्तर देऊ शकल्या नाहीत. ट्रान्सपोर्टेशन कॉन्ट्रॅक्ट असेल तर शाळेची जबाबदारी राहणार नाही का असे चिमुरडीच्या कुटुंबीयांनी विचारले. मुलांना गुड टच बॅड टचचे ट्रेनिंग दिल्यामुळेच ही घटना उघड होऊ शकली असे शाळेच्या प्रिंसिपल म्हणाल्या. 


मुलीची आई म्हणाली, तुला माफ करेल तेव्हा कबूल केला गुन्हा 
पोलिसांनी या आरोपीला पोलिस ठाण्यात एका कोपऱ्यात बसवले होते. पोलिसांच्या सांगण्यावरून मुलीची आई त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, तू माझ्या मुलीबरोबर काय केले आहे? खरं सांगितले तर मी तुला माफ करेल.. असे म्हटल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला होता. 

बातम्या आणखी आहेत...