आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गिअर शाफ्टच्या जागेवर बांबूचा तुकडा लावून चालवत होता स्कूलबस, BMW ला धडकल्याने झाली पोलखोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

3 दिवसांपासून तशीच चालवत होता स्कूलबस, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील प्रकार

 

मुंबई- शहरातील सांताक्रुझ परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्कूलबस चालक विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ खेळताना कॅमेर्‍यात कैद झाला आहे. चालकाने स्कूलबस गिअरशाफ्टच्या जागेवर बांबूचा तुकडा बसवला होता. मागील तीन दिवसांपासून चालक अशा अवस्थेत बस चालवत होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बुधवारी (ता.6) सायंकाळी बसचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही बस पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची असल्याचे समजते. स्कूलबसचा गिअर शाफ्ट तुटला होता. त्यामुळे चालकाने गिअर शाफ्टच्या जागी बांबूचा तुकडा बसवला होता. मागील तीन दिवसांपासून चालक अशाच अवस्थेत बस चालवत होता. चालक राजकुमारला अटक करण्‍यात आली असून बस ऑपरेटरची चौकशी सुरु करण्यात आली आहे. बस ऑपरेटरच्या एकूण 12 बस चालतात.

 

 

BMW ला धडकल्यानंतर झाली पोलखोल..

सांताक्रुझ येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या बसने मंगळवारी खार येथील एका व्यापार्‍याच्या BMW ला जोरदार धडक दिली. कारचालक बसच्या कॅबिनमध्ये शिरल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. कार मालकाने दिलेल्या तक्रारीवरून खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...