आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलवर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला बसने चिरडले, एसटी ड्रायव्हर गाडी सोडून पसार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बस मानव विकास मिशनची विद्यार्थ्यांसाठीचीच आहे

परभणी - कौसडी(ता.जिंतूर) येथून जवळच असलेल्या बोरी येथील शाळेत सायकलवर जात असलेल्या विद्यार्थ्याचा एस.टी.बसच्या धडकेने गुरुवारी(दि.पाच) सकाळी सातच्या सुमारास जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे धडक देणारी बस ही मानव विकास मिशनची विद्यार्थ्यांसाठीचीच आहे. घटनास्थळावरून पोबारा केलेला बसचालक पोलिसांच्या ताब्यात आला आहे.  कौसडी येथील अनिल तुकाराम सांगुळे(१५) हा बोरी येथील शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत असून तो दररोज सकाळी सहाच्या सुमारास आपल्या सायकलवरून बोरीकडे निघतो. कौसडी ते बोरी हे अंतर चार किमीचे आहे. गुरुवारी ही सकाळी सहाच्या सुमारास अनिल हा सायकलवर दप्तर घेऊन शाळेसाठी निघाला होता. त्याच वेळी जिंतूर आगारातील मानव विकास मिशनची बस (एम.एच.२२-बीएल-३४९५) ही जिंतूरहून बोरी-कौसडी मार्गे मारवाडी या गावाकडे शाळकरी विद्यार्थिनींना आणण्यासाठी जात होती. कौसडी फाट्या जवळील धार्मिक शाळेसमोर या बसने अनिल सांगुळे याला समोरून जोरदार धडक दिली. घटनास्थळीच अनिल हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला. चालक नितीन गायकवाड याच्यावर बोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. 

बातम्या आणखी आहेत...