पाकिस्तानातील आश्चर्य: मंदिरातील / पाकिस्तानातील आश्चर्य: मंदिरातील शाळेत हिंदु मुलांना शिकवते मुस्लीम टिचर, 'सलाम'चे उत्तर 'जय श्रीराम' ने

दिव्य मराठी वेब टीम

Aug 24,2018 12:05:00 AM IST

कराची - येथील एका हिंदु मंदिरामध्ये शाळा भरते. अनुम आगा नावाची टिचर हिजाब परिधान करून हिंदु मुलांना शिकवते. वर्गात येताच टिचर मुलांना सलाम करतात. मुले त्याला जय श्रीराम म्हणत उत्तर देतात. मंदिर ताब्यात घेण्यासाठी अनेक भू-माफियांनी अनेकदा धमकी दिली आहे. पण अनुम घाबरल्या नाही किंवा त्यांनी कर्तव्य करणेही सोडले नाही.


मंदिराच्या आसपास अत्यंत वाईट अवस्था असलेल्या घरांमध्ये 80-90 हिंदू कुटुंबे राहतात. शिकवल्यानंतर अनुम मुलांच्या घरी जाऊनही चर्चा करतात. अनुम सांगतात की, जेव्हा मी लोकांना या मंदिरातील शाळेबाबत सांगते तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते. पण आमच्याकडे शाला चालवता येईल अशी दुसरी जागा नाही. मुलांचे वर्ग मंदिरात ज्याठिकाणी भरतात त्याठिकाणी देवी-देवतांच्या मूर्तीही आहेत.


हिंदुंना दिली जातेय धमकी
हिंदु समुदायाचे नेते शिवा धरणी यांनी सांगितले की. चार वर्षात दोन वेळा हिंदुंची घरे जाळण्यात आली. त्यांना हा परिसर सोडण्यासाठी सारख्या धमक्या दिल्या जातात. नुकतेच प्रशासनाने हिंदुंच्या घरातील वीज पाण्याचे कनेक्शनही कापले आहे. त्यानंतरच या परिसरात हिंदु मुस्लीमांमध्ये तणाव राहतो. काही काळापूर्वीही येथे तणाव झाला होता. त्यावेळी एका मुस्लीमाने मंदिराच्या जागेवर मशीद तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मानवाधिकार कार्यकर्ते आरीफ हबीब यांच्यामते भूमाफिया मौलवींना चिथावणी देतात. हिंदुंपासून आपल्याला धोका असल्याचे सांगतात. त्यांना फक्त मंदिराची जमीन हवी आहे.


मुस्लिमांना नकोसे झालेत हिंदु
अनुम सांगतात की, मंदिराजवळ राहणाऱ्या मुस्लिमांना हिंदुंनी तेथे राहू नये असे वाटते. ते मुस्लीमांना कनिष्ठ दर्जाचे समजतात. त्यांना मूळ अधिकारांबाबतही माहिती नाही म्हणून मी शाळेत शिकवायला जाते. त्यांच्या मुलांना शिक्षणाची गरज आहे. हिंदु लोकांच्या मुलांना आणि विशेषतः मुलींना शिकण्यासाठी दूर जावे लागत नाही यामुळे ते आनंदी आहेत.

X
COMMENT