आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थाचालकांच्या मनमानीला लगाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती आता सीईटीद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे संस्थाचालकांकडून होणारी मनमानी शिक्षक भरती बंद होणार आहे. खासगी संस्थाचालक गुणवत्ता नसलेले शिक्षक भरती करत होते. तसेच नातेवाइकांची वर्णी लागत होती. त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहारही मोठ्या प्रमाणावर चालत असत. राज्य शासनाच्या नजरेत या बाबी येत असूनही राजकीय लागेबांधे असल्याने कारवाई होत नव्हती. राज्य शासनाच्या निर्णयामुळे हजारो डी. एड., बी. एड. धारकांना आता नोकरीचा मार्ग मोकळा झाला. विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. नवीन शिक्षण हक्क कायद्यानुसार 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण लागू केल्यास शिक्षकांच्या रिक्त जागा निघण्याची शक्यता आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा मिळेल.