आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्‍यात शाळेत घुसून विद्यार्थ्‍याच्‍या नातेवाईकांची मुख्‍याध्‍यापकाला जबर मारहाण, घटना सीसीटीव्‍हीत कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - चिखली येथील 'तक्षशिला माध्‍यमिक आणि उच्‍च विद्यालय' या शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकाला विद्यार्थ्‍याच्‍या नातेवाईकांनी लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केल्‍याची घटना घडली आहे. या हल्‍ल्‍यामुळे मुख्‍याध्‍यापक गंभीररीत्‍या जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच लोकांविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटकही करण्‍यात आली आहे. मारहाणीची घटना क्‍लासमधील सीसीटीव्‍ही कॅमे-यात कैद झाली आहे.

 

वर्गात घुसून केली मारहाण
याविषयी मुख्‍याध्‍यापक सुनिल हरिभाऊ वाळसे यांनी सांगितले की, मागील बुधवारी कृष्‍णा मंजुळकर नावाचा विद्यार्थी आपल्‍यासोबत 5 लोकांना घेऊन वर्गात शिरला व त्‍यांच्‍यावर जीवघेणा हल्‍ला केला. यावेळी आपण त्‍यांना वारंवार कारण विचारत होतो, मात्र ते काहीच ऐकण्‍यास तयार नव्‍हते. तर विद्यार्थ्‍याच्‍या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, इंग्रजीचा क्‍लास सुरू असताना मुख्‍याध्‍यापकांनी कृष्‍णाला जबर मारहाण केली. मात्र हा आरोप फेटाळून लावत मुख्‍याध्‍यापकांनी आपण त्‍याला गृहपाठ केला नाही म्‍हणून केवळ खडसावले, असे सांगितले आहे.


शिक्षकांनी पुकारला होता संप
याप्रकरणी मुख्‍याध्‍यापक सुनिल वाळसे यांनी तक्रार केल्‍यानंतर मारहाण करणा-या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेविरोधात शाळेच्‍या शिक्षकांनी एक दिवसाचा संपही पुकारला होता.  


 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...