आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस'च्या एक्स कंटेस्टेंटकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी मुलांनी लावल्या रांगा, एली अवराम पोहोचली शाळेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बिग बॉसची एक्स कंटेस्टेंट आणि बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एली मुंबईच्या एका शालेय परिसरात दिसतेय. या दरम्यान एली आपल्या कारमध्ये बसल्या बसल्या मुलांना ऑटोग्राफ देत आहे. विशेष म्हणजे एलीकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी मुलं लांब रांगा लावून उभे आहेत. या शाळेत मुलांना मोबाइल घेऊन जाण्यास परवाणगी नाही. मुलांनी एली अवरामला पाहिले तेव्हा त्यांनी विचार केला की, सेल्फी घेता आला नाही तर ऑटोग्राफ घेऊ. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून यूजर्सने एली अवरामच्या ड्रेसवर कमेंट करणे सुरु केले. एक यूजर तर म्हणाला की, "कमीत कमी लहान मुलांसमोर तरी अंग प्रदर्शन करु नको."

 

वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर एली अवराम लवकरच सैफ अली खान स्टारर मूव्ही 'बाजार'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 26 अक्टोबरला रिलीज होणार आहे. एली स्वीडनमध्ये राहणारी आहे. ती 2013 मध्ये रियालिटी शो 'बिग बॉस' सीजन 7 ची कंटेस्टेंट राहिली आहे. तर 2014 आणि 2015 मध्ये तिने या शोमध्ये गेस्ट अपीयरेन्स दिला होता. एलीने 2013 मध्ये फिल्म 'मिकी व्हायरस' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ती 'किस किस को प्यार करुं', 'पोस्ट बॉइज' आणि 'नाम शबाना' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. 

बातम्या आणखी आहेत...