Home | National | Other State | school student made LPG gas device, it Alerts when gas leak

किचनमध्ये गॅस लीक झाला तर 3 सेकंदात मोबाईलवर येईल अलर्ट, रेगूलेटरही होईल आपोआप ऑफ...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:04 PM IST

हे डिवाइस आयआयटीच्या विद्यार्थ्याने नाही तर, एका शाळेतल्या विद्यार्थ्याने बनवले आहे.

  • school student made LPG gas device, it Alerts when gas leak


    धनबाद(झारखंड़)- किचनमधल्या एलपीजी सिलेंडरमधून गॅस लीक झाली तर मोबाइलवर 3 सेकंदात येईल अलर्ट मेसेज येईल. इतकेच नाही तर घरातील विज उपकरणासोबत लावलेला एमसीबीही डाऊन होऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सिलेंडरमध्ये लावलेले रेगुलेटरही लगेच बंद होईल. हे डिवाइस एखाद्या आयआयटीच्या विद्यार्थ्याने नाही तर शाळेतील विद्यार्थ्याने बनवले आहे.

    डीएवी कोयलानगरमध्ये 8 वीत शिकणाऱ्या विशाल रंजनने एलपीजी लीकेज डिटेक्टर होम ऑटोमेशन बनवले आहे. या टेक्नीकला आता यूएसएमध्ये आयोजित इंटरनॅशनल शोकेसमध्ये दाखवले जाईल. नीति आयोगचे अटल इनोवेशन मिशनकडून नवी दिल्लीच्या मानेकशाव ऑडिटोरिअममध्ये मेक टुमारो फॉर फ्यूचर इनोव्हेशन जनरेशन विषयावर नॅशनल शोकेसचे आयोजन केले होते. विशाल रंजनच्य़ा प्रोजेक्ट सोबतच एकूण 10 प्रोजेक्टचे सलेक्शन इंटरनॅशनल शोकेससाठी झाले आहे.

Trending