आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनजागृती अभियानातून चिमुकल्यांनी झाडाच्या पानाद्वारे दिला मतदान करण्याचा संदेश; ग्रामस्थांना मतदान करण्याचे केले आवाहन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर - बिलबारा येथील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी झाडाच्या पानावर मतदार जनजागृती करून लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्साहात सहभागी होण्याचा नारा दिला. विद्यार्थ्यांनी बदामाच्या पानावर मतदान जागृतीचे घोषवाक्य लिहून पालकांना दिले. सोबतच मतदानाविषयी गावात जनजागृती केली. यात मतदान करा, आमचे आईबाबा मतदान करणार आपण देखील मतदान करा, माझं मत माझा अधिकार, मतदान करा महाराष्ट्र घडवा, मतदान सर्वांचा अधिकार, तुमचे एक मत ठरवेल देशाचे बहूमत असे घोषवाक्य लिहिले. यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक महेंद्र वळवी, वर्गशिक्षक नीलेश पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...