आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय विद्यार्थी सांगतील स्मार्टफोनने स्वत:ला कसे स्मार्ट ठेवता येईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली शिक्षण विभागाने सप्टेबरच्या पहिल्या आठवड्यात विज्ञान विषयातील गोडी वाढावी म्हणून अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.  यात सायन्स ड्रामा, सायन्स सेमिनार व सायन्स प्रदर्शन असे अनेक उपक्रम घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वाद-विवाद स्पर्धाही आयोजित केली आहे. या स्पर्धेत “शिक्षणात स्मार्टफोनचा वापर’ असा सर्वात महत्वाचा विषय ठेवण्यात आला आहे. आजची तरुण पिढी स्मार्टफोनवर व्यग्र असते. ही मुले व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्ट्रग्रामव टिकटॉकवर दंग होऊन गेलेले दिसतात.  परंतु विद्यार्थी या स्मार्टफोनचा वापर अभ्यासासाठी कसा  करून घेता येईल, हे समजावून सांगतील. याचे सादरीकरण शिक्षक आणि तज्ञांच्या पॅनेलसमोर होईल. तथापि, या ग्रुपमधील दुसरा विरोधी गट स्मार्टफोनचे वाईट परिणामही सांगेल. दोन्ही बाजूच्या गटांना बोलण्यासाठी प्रत्येकी सहा मिनिटांचा अवधी असेल. दिल्लीतील रस्त्यावर बिघडलेली वाहतूक व्यवस्था या विषयावर मुलांसाठी विज्ञान पोस्टर स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यात इयत्ता ६ वी ते ८ वीतील मुलांना दिल्लीच्या रस्त्यावरील वाहतुक समस्या हा विषय देण्यात आला आहे. 

 

गांधी, विज्ञान विषयावर विद्यार्थ्यांची नाटके

विज्ञान नाटय् श्रेधीत विद्यार्थी गांधी आणि विज्ञान या विषयावर नाटक सादर करणार आहेत. तर स्वच्छता, आरोग्य, ग्रीन अँड क्लीन  एनर्जी या विषयावर  उत्तर भारतातील राज्यांच्या प्रत्येकी दोन संघात स्पर्धा होईल. २ यशस्वी संघांना बिर्ला इंडस्ट्रियल टेक्नाॅलॉजीकल संग्रहालय कोलकाता येथेक होणाऱ्या ड्रामा फेस्टिव्हलमध्ये संधी मिळेल. 

 

८ वी ते १२वीच्या मुलांना जल व्यवस्थापन विषय

८ वी ते १२ वीच्या मुलांना जल व्यवस्थापन व पहिली ते ५वीच्या मुलांसाठी वनमहोत्सव हा पोस्टरचा विषय देण्यात आला आहे. क्विझ स्पर्धेचा विषय ग्लोबल वॉर्मिंगचा असून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय विज्ञान केंद्राच्या वतीने ही स्पर्धा विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणार असल्याची माहिती दिली. तर शिक्षण विभागाच्या उपसंचालक डा. सुषमा सेतिया यांनी सांगितले, स्पर्धेत जे संघ विजेते ठरतीली त्यांच्यातील दोन संघ राष्ट्रीय पातळीवर जातील. 

बातम्या आणखी आहेत...