आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाने विद्यार्थिनीला लिहिली अशी चिठ्ठी, आईने पाहताच बसला जबरदस्त धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा - हरियाणामध्ये एका शिक्षकाने गुरू-शिष्याच्या नात्याला कलंकित करण्याची घटना घडली आहे. शिक्षकावर आठवीच्या विद्यार्थिनीची छेडछाड केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

विद्यार्थिनीला लिहिली अशी चिठ्ठी...
ही घटना हरियाणातील पिहोवा गावातील आहे. येथे एका शाळेत शिकवणारे शिक्षक सतनाम सिंह यांच्यावर आठवीतील विद्यार्थिनीची छेडछाड केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा खुलासा याच शाळेत शिकवणाऱ्या विद्यार्थिनीच्या भावाने केला. त्याने सांगितले की, शिक्षक सतनाम सिंहने त्याच्या बहिणीला एक चिठ्ठी दिली होती. यात लिहिले होते की, "मी कॉल करेन, तेव्हा तू आपल्या भावाबहिणीपासून दूर जाऊन बोल."

 

घरी गेल्यावर तिच्या बहिणीने ही चिठ्ठी आपल्या आईला दाखवली. आईने चिठ्ठी पाहताच तिलाही धक्का बसला. दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन त्यांनी थेट मुख्याध्यापकाची केबिन गाठली आणि तक्रार केली. ही केस समोर आल्यानंतर शाळेतील आणखी काही विद्यार्थिनीसमोर आल्या. त्यांनी सांगितले की, शिक्षकाने याआधीही त्यांच्यासोबत असे कृत्य केले आहे. परंतु भीतीमुळे कुणीही त्यांची तक्रार केली नाही. असे सांगितले जाते की, या शिक्षकाने शाळेतीलच एका शिक्षकेला प्रपोजही केले होते.


कुटुंबीयांनी घातला शाळेत गोंधळ, पोलिसांनी केली अटक

या खुलाशानंतर पालकांनी शाळेत गोंधळ घातला. कुटुंबीयांनी आरोपी शिक्षकाच्या त्वरित अटकेची मागणी केली. यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक सतनाम सिंहविरुद्ध पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुसरीकडे, शाळेचे मुख्याध्यापक म्हणतात की, आरोपी शिक्षकाला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे आणि आरोपीला शिक्षाही झालीच पाहिजे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...