Home | National | Delhi | School teacher tape small child's to shut mouth

शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत करत होती गैरवर्तणुक, मुलांनी आवाज करू नये यासाठी सेलो टेपने केले तोंड बंद

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 03:12 PM IST

दिल्लीच्या नारायणा टेक्नो स्कूल येथील घटना

 • School teacher tape small child's to shut mouth

  नवी दिल्ली - शाळा हे मुलांचे दुसरे घर असते. मुले दिवसभरातील 6 ते 8 तास शाळेमध्ये असतात. या निष्पाप मुलांना त्यांचे आई-वडील मोठ्या आशेने शिक्षणासाठी शाळेत पाठवत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, त्याच्यासोबत शाळेत काय काय होते? अनेकवेळा मुलांना शारीरिक आणि मानसिकरित्या टॉर्चर केले जाते. सायबर सिटीच्या नारायणा टेक्नो स्कूल या एका खासगी शाळेतील अशीच टॉर्चर करणारी घटना समोर आली आहे. येथे मुलांना विचित्र पद्धतीने टॉर्चर केले जात आहे.

  कर्मचाऱ्याने केला विडिओ व्हायरल

  शाळेतील एका कर्मचाऱ्याने टॉर्चर करण्याचा विडिओ इंटरनेटवर अपलोड केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. यानंतर सोशल मिडीयावरही हा विडिओ व्हायरल झाला आहे. एक महिला शिक्षिका मुलांच्या तोंडावर सेलो टेप लावून त्यांना टॉर्चर करत असल्याचे या विडिओमध्ये दिसत आहे. दीक्षा कोहली असे या महिला शिक्षिकेचे नाव आहे. हा विडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे.

  प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष
  ही घटना 6 ऑक्टोबरची आहे. पण या घटनेचा विडिओ काही दिवसांपू्र्वीच सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. निष्पाप मुलांसोबत असे वर्तन केल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत. सोबतच शिक्षिकेच्या या वर्तवनुकीनंतर शाळेच्या व्यवस्थापनेवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कारण शिक्षिका ज्या विचित्र पद्धतीने सेलो टेपच्या सहाय्याने मुलांचे तोंड बंद करत आहे त्यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशात प्रशासन शाळा व्यवस्थापनाच्या विरूद्ध काय पाऊल उचलते हे पाहावे लागणार आहे.

Trending