आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसची स्कूल व्हॅनला जोराची धडक, व्हॅनचा झाला चेंदामेंदा, रस्त्यावर पडले होते मुलांचे मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडीओ डेस्क - मध्य प्रदेशमधील सतनापासून 40 किलोमीटर दूर बिरसिंगपूर मार्गावर लकी कॉन्व्हेंट शाळेची व्हॅन आणि भरधाव बसची समोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये 7 मुलांसह व्हॅन चालकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 10 लोक या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मुलांची संख्या जास्त आहे. 

 

व्हॅनचा झाला चेंदामेंदा, एकाच परिवारातील 4 मुलांचा मृत्यू
> ड्रायव्हर मुलांना शाळेत सोडायला जात असतांना हा अपघात झाला. भरधाव येणाऱ्या बसने व्हॅनला समोरा-समोर जोरात धडक दिली. अपघात इतका भीषण होता की यामध्ये व्हॅनसोबत मुलांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यामध्ये 6 मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. सर्व जखमींना बिरसिंगपूर येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्युमुखी पडलेल्या 7 मुलांपैकी 4 मुले एकाच परिवारातील होते. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...