आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंगीचे इंजेक्शन देऊन व्हॅन ड्रायव्हर आणि क्लीनरने केला 4 वर्षीय मुलीवर बलात्कार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोयंबटूर(तमिळनाडू)- येथून एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खासगी शाळेत शिकत असलेल्या 4 वर्षीय मुलीवह बलात्कार झाला आहे. मिळालेल्या माहितीनूसार हा बलात्कार व्हॅन ड्रायव्हर गोविंदराज आणि क्लीनर मरीमुथूने केला असून त्यांच्यावर पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  


मुलगी एका खासगी शाळेत शिकते. पोलिसांनी सांगितले की, मुलीला गुंगीचे इंजेक्शन देऊन शाळेच्या व्हॅनमध्येच. नंतर मुलीनेच तिच्या पालकांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर थुदियालूर महिला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर तत्काळ कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. 


ही पहीलीच वेळ नाही जेव्हा शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून शाळेतील मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले असेल. याआधीही अनेकवेळा अशा घटना घडल्या आहेत, त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार सांगण्याते येते की, कर्मचाऱ्यांनी भरती करतेवेळी त्यांचे बॅगग्राउंड तपासून पाहावे.


काय आहे पॉक्सो अॅक्ट
पॉस्को अॅक्ट अंतर्गत अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक शोषण, बलात्कार आणि छेडछाडीच्या प्रकरणात कारवाई केली जाते. हा अॅक्ट मुलांना सेक्शुअल हारॅसमेंट, सेक्शुअल असॉल्ट आणि पोर्नोग्राफीसारख्या गंभीर अपरांधापासून मुलांना सुरक्षित ठेवते. या गुन्ह्या 10 वर्षे किंवा आजिवन कारावासाची शिक्षादेखील होऊ शकते.

 

बातम्या आणखी आहेत...