आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालत्या स्कूल व्हॅनमध्ये सिलेंडरचा स्फोट, 12 मुले जखमी तर 3 जणांची प्रकृती गंभीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भदोही (उत्तरप्रदेश) : येथे शऩिवारी सकाळच्या सुमारास एक स्कूल व्हॅनमधील गॅस सिलेंडर फुटल्याने आग लागल्याची दुर्घटना घडली. यामध्ये 12 मुले जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना सिलेंडरमध्ये स्फोट झाला आणि त्यामुळे गाडीला आग लागली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

 

जिल्हा मुख्यालयापासून 12 किमी दूर अंतरावर ही दुर्घटना घडली. पोलिसांच्या मते. या गाडीमध्ये स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे सिलेंडर लावण्यात आले होते. गाडीमध्ये 12 मुले होते. त्यांना शाळेत सोडण्यासाठी गाडी निघाली असता वाटेतच सिलेंडरचा स्फोट झाला आणि गाडीला आग लागली. या आगीत 12 मुले जखमी झाले असून तिघांची प्रकृती नाजूक आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले तर प्रकृती गंभीर असलेल्या मुलांना वाराणसी येथे हलविण्यात आहे. 

 

गेट लॉक करून ड्रायव्हर झाला फरार

मीडिया रिपोर्ट्सच्या मते, आग लागल्यानंतर व्हॅनचा ड्रायव्हरने तेथून पळ काढला. व्हॅनला आग लागल्यामुळे आतमधील मुले आरडाओरड करू लागली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सीता शुक्ला यांनी व्हॅनमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याच प्रयत्न केला. नंतर तेथे इतरही लोक जमा झाले. त्यांनी व्हॅनचा दरवाजा तोडून मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत अनेक मुले भाजली गेली होती. 

 

पालकांनी केली कारवाईची मागणी

घटनेची माहिती मिळताच मुलांच्या पालकांनी रूग्णालयात धाव घेतली आणि तेथे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी स्कूल व्हॅन मालकावर गुन्हा दाखल कूरन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. 

बातम्या आणखी आहेत...