आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत कोणीतरी टी-शर्टवर फेकले पनीर, खाजेसह श्वास घेण्यास झाला त्रास, 11 दिवस ICU मध्ये उपचारानंतर मुलाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडमध्ये एका मुलाबरोबर एक विचित्र घटना घडली आहे. शाळेत या 13 वर्षाच्या मुलाच्या टी शर्टवर दुसऱ्या विद्यार्थ्याने मुद्दाम पनीर फेकले. त्यानंतर त्या मुलाची एवढी वाईट अवस्था झाली की, त्याच्या शरिरात प्रचंड खाज येऊ लागली, त्वचाही पूर्ण गरम झाली आणि श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. 11 दिवस ICU मध्ये उपचार झाले पण अखेर त्याचा मृत्यू झाला. हे सर्व घडले डेअरी प्रोड्क्ट्सच्या अॅलर्जीमुळे. सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. 


टी-शर्टवर फेकले पनीर 
- ही घटना याचवर्षी जूनमध्ये वेस्ट लंडनच्या ग्रीनफोर्डमधील चर्च ऑफ इंग्लंड हायस्कूलमधील आहे. येथे 13 वर्षीय करनबीर चीमा शिक होता. त्याला गहू, नट्स, डेअरी प्रोडक्ट आणि अंड्यांची अॅलर्जी होती. त्याबाबत शाळेतील सर्व विद्यार्थी आणि स्टाफलाही माहिती होती. 
- स्कूल स्टाफने सांगितले की, शाळेच्याच विद्यार्थ्याने करनवीरला त्रास देण्यासाठी पनीर घेऊन त्याला पाठलाग केला आणि नंतर त्याच्या टी शर्टवर पनीर फेकले. 
- त्यानंतर पनीरमुळे अशीकाही रिअॅक्शन झाली की, लगेचच त्याच्या शरिरात खाज येऊ लागली आणि स्किन गरम झाली. काही वेळातच च्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. 
- करनने स्कूल स्टाफला सांगितल्यानंतर त्याला प्रथमोपचार करून लगेच इमर्जन्सी सर्व्हीसचा माहिती देण्यात आली. 

 

बेशुद्धावस्थेत पोहोचला हॉस्पिटलमध्ये 
- डॉक्टरांचे पथक सात मिनिटांत याठिकाणी पोहोजचले पण तोवर मुलाची अवस्था गंभीर झाली होती. त्याच्या जीवाला धोका होता. 
- डॉक्टरांनी कोर्टात सांगितले की, त्यांना त्याठिकाणी पोहोचतास समजले होते की, ही जीवघेणी स्थिती आहे. अशा स्थितीत रुग्णाला कर्डिअॅक अरेस्ट आणि रेस्पिरेट्री अरेस्ट होण्याचा धोका वाढतो. 
- त्याने सांगितले की, इन्हेलर, स्पेशल पेन आणि पिरीटन उपचारानंतरही करन मृत्यूशी संघर्ष करत होता. त्याला सीपीआर दिल्यानंतर हृद्याचे ठोके काहीसे सुरू झाले. 
- बेशुद्धावस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. 11 दिवस ICU मध्ये राहिल्यानतर त्याचे निधन झाले. न इन्टेंसिव केयर में रहने के बाद उसने दम तोड़ दिया।


काय म्हणाली आई.. 
करनची आई रिना चिमा म्हणाल्या, तो अत्यंत हुशार मुलगा होता. त्याला हवे ते तो करू शकत होता. मी त्याच्या मेडिकल कंडिशनबाबत माहिती देऊन त्याला पूर्णपणे तयार केले होते. तरीही आम्ही त्याला गमावले आहे. करनच्या मृत्यूप्रकरणी 13 वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याच्यावर काही चार्ज लावलेला नाही. 

 

पुढे पाहा फोटो...

बातम्या आणखी आहेत...