आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होमवर्कचे विचारताच विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला केले अश्लील इशारे, एकाने तर केली हद्द पार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पॅरिसच्या एका शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षिकेवर अश्लील कॉमेंट्स केल्यामुळे त्यांना तुरुंगवारी घडली आहे. या विद्यार्थ्यांचे कारनामे अवघ्या जगात चर्चेचा विषय ठरलेले आहेत. वास्तविक, वर्गात शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिलेल्या होमवर्कबद्दल विचारले. तेवढ्यात काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत आपल्या जागेवरून उठून शिक्षिकेसमोर धाव घेतली. यानंतर एका विद्यार्थ्याने जे केले त्यामुळे सगळेच चकित झाले.

 

शिक्षिकेच्या कानशिलावर लावली बंदूक अन्...
शिक्षिकेच्या समोर येऊन एका विद्यार्थ्याने बंदूक काढली, तर दुसऱ्याने कॅमेरा काढला. बंदूक हाती घेतलेल्या मुलाने आपल्या शिक्षिकेच्या कानशिलावर बंदूक लावली आणि डोके खाली झुकवायला सांगितले. यादरम्यान तेथे उपस्थित विद्यार्थी अश्लील इशारे करत हसू लागले.


फ्रान्सच्या राष्ट्रपतींपर्यंत गेला व्हिडिओ, दिले कारवाईचे निर्देश
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, जो वेगाने व्हायरल झाला. व्हिडिओ एवढा शेअर झाला की, तो फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्यापर्यंत पोहोचला. व्हिडिओ पाहिल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी विद्यार्थ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. यानंतर या मुलांना ताब्यात घेऊन कोर्टापुढे हजर करण्यात आले. न्यायाधीशांना ते म्हणाले की, ते आपल्या शिक्षिकेला नकली बंदूक  घेऊन भीती घालण्याचा प्रयत्न करत होते. आणि शिक्षिकेची ही भीती त्यांना आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करायची होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

 

बातम्या आणखी आहेत...