आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउताह - अमेरिकेच्या उताह परिसरात दोन शालेय मुलांनी असे कृत्य केले जे पाहून लोकांना धक्काच बसला. येथे राहणार्या 14 आणि 15 वर्ष वयाच्या दोन मुलांनी शाळेतून पळून जात एका ट्रॅक्टरची चोरी केली. ते चालवत ते एका प्रायव्हेट एअरपोर्टवर पोहोचले. त्यानंतर दोघांनी मिळून एक प्रायव्हेट प्लेनही चोरले. नंतर तर त्यांनी एखाद्या व्हिडिओ गेमप्रमाणे विमान उडवले आणि ते शहरावर फिरू लागले.
एअर ट्राफिक कंट्रोलचा उडाला गोंधळ
येथील जेनसेन परिसरात पोहोचल्यानंतर दोघांनी धावपट्टीच्या जवळ उभे असलेले एक सिंगल इंजीन असलेले लाइट स्पोर्ट एअरक्राफ्ट चोरले. दोघांनी ते सुरूही केले आणि पाहता पाहता विमान उडवायला लागले.
एअर ट्राफिक कंट्रोलशी बोलले
जेव्हा एअर ट्राफिक कंट्रोलने विमानाशी रेडिओवर संपर्क केला तेव्हा उत्तर मिळाले की, दोघे परत येत आहेत. पण दोघांनी परत न येता विमान 100 किलोमीटर फिरवले आणि नंतर वरनाल येथील धावपट्टीवर विमान उतरवले. पोलिसांनी याठिकाणी त्यांना लोकेशनच्या आधारे अरेस्ट केले. त्यानंतर दोघांना डिटेंशन सेंटरला पाठवण्यात आले. वरनाल कौंटी पोलिसांनी दोघांनी विमान चोरून पळाल्याने मान्य केले असल्याचे सांगितले. दोघांवर अनेक कलमे लावण्यात आली असून तपास सुरू आहे.
व्हिडिओ गेम्सचा प्रभाव
मुलांनी अशाप्रकारे आधी ट्रॅक्टर आणि नंतर विमान चोरून उडवण्याच्या या घटनेने सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. लोक याचा संबंध जीटीए आणइ सॅन एंड्रियाज अषा गेम्सशी जोडत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, व्हिडिओ गेम्सचा मुलांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.