आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार पासून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना 31 तारखेपर्यंत सुट्टी, कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारने घेतला निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला

मुंबई- राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागाने आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस टाळण्यासाठी गर्दी टाळा असा सल्ला दिला जात आहे. पण सर्वाधिक गर्दी होणारे ठिकाण म्हणजे शाळा आहेत. येथे होणारी गर्दी ही चिमुकल्यांची आहे. विद्यार्थी हा सर्वात जास्त समूहाच्या संपर्कात येतो. समूहामुळे कोरोनाचा संसर्ग जास्त वाढू शकतो अशी भीती असल्याने राज्य सरकारने खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. करोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबरोबरच विद्यापीठांमधील परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील, असंही पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

बातम्या आणखी आहेत...