आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा बाेटांचे लाेक चांगले काम करतात, मेंदूही तल्लख चालताे; शास्त्रज्ञ म्हणाले- कामातील गतीसाठी ६ बाेटांचा राेबाे तयार करू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्युनिक - ज्या लाेकांच्या हाता-पायांना सहा बाेटे असतात ते पाच बाेटे असणाऱ्या लाेकांच्या तुलनेत जास्त चांगल्या पद्धतीने काम मार्गी लावतात. त्यांचा मेंदू पाच बाेटे असणाऱ्यांच्या तुलनेत वेगाने काम करताे. यासाेबत प्रत्येक कामात चांगले संतुलनही हा राखताे. जर्मनीच्या युनिव्हर्सिटी अाॅफ फ्रीबर्ग अँड इंपिरियल काॅलेजने नुकत्याच केलेल्या संशाेधनात ही बाब समाेर अाली अाहे. संशाेधकांच्या म्हणण्यानुसार, हात वा पायाला अतिरिक्त बाेटे असणे हा काेणता अाजार नसताे. याला शास्त्रीय भाषेत पाॅलिडेक्टिली म्हटले जाते. अशी ८०० व्यक्तींमागे एक व्यक्ती असते. सरासरी ५०० पैकी एक व्यक्ती शस्त्रक्रिया करून ते काढूनही टाकते. संशाेधकानुसार, भविष्यात तयार केल्या जाणाऱ्या राेबाेमध्येही सहा बाेटांचा विस्तार झाला पाहिजे. यामुळे ताे अाणखाी वेगाने काम करू शकेल. नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित अहवालानुसार, सहा बाेटांच्या लाेकांमध्ये हे बाेट अंगठा व तर्जनीच्या मध्ये असते. यामुळे ते अापले काम पाच बाेटांच्या तुलनेत सहज करतात. असे लाेक बुटाची लेस बांधण्यापासून टायपिंग करणे, पुस्तकाचे पान उलटणे व माेबाइल किंवा व्हिडिओ गेम खेळण्यात जास्त गतीने काम करतात. असे असले तरी त्यांना हातमाेजे व बूट घालताना त्रास हाेताे. विद्यापीठातील जैवअभियांत्रिकी विभागाचे प्रा. एटीने बर्डेट यांच्या म्हणण्यानुसार, अशी स्थिती जन्मत: असते. मात्र, याचा कितपत उपयाेग हाेऊ शकताे, याचा काेणी अभ्यास केला नाही.

 

सहा बाेटांच्या स्वप्ना बर्मनने भारताला सुवर्णपदक दिले
भारतात सहा बाेटांच्या व्यक्तींबाबत एक मिथक प्रचलित अाहे. त्यांना नशीबवानही मानले जाते. अभिनेता ऋतिक राेशन व प्रसिद्ध अॅथलिट स्वप्ना बर्मनने हे मिथक योग्य असल्याचे सिद्ध केले आहे. स्वप्ना बर्मनने पायाला सहा बोटे असतानाही २०१८ मध्ये जकार्ता एशियन गेम्सच्या हेप्टाथलॉनमध्ये पहिल्यांदा भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. तिची पाॅलिडेक्टिली तिसऱ्या प्रकारची अाहे, ज्यामध्ये सहाव्या बाेटात मांसही अाहे अाणि हाडही. तिने अद्याप ते काढले नाही.

बातम्या आणखी आहेत...