आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 म्हाताऱ्यांना दोन वर्षे रोज दिल्या Viagra च्या गोळ्या, परिणाम पाहून डॉक्टरही म्हणाले-हा तर चमत्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जगभरात व्हायग्राची औषधे सेक्ससंबंधी समस्यांवर उपचारासाठी वापरली जातात. पण अमेरिकेत याचा वापर वेगळ्या पद्धतीने करण्यात आला. येथील पाच ज्येष्ठांना दोन वर्षे रोज व्हायग्राच्या गोळ्या खायला दिल्या. विशेष म्हणजे यातून जे निष्कर्ष समोर आले ते पाहून शास्त्रज्ञांनाही धक्का बसला. कारण ते एखाद्या चमत्कारासारखे होते. शास्त्रज्ञांच्या मते, व्हियाग्राच्या औषधामुळे डोळ्यांना नव्याने जीवनदान मिळू शकते. डोळ्यांची दृष्टी परत मिळवून देण्याबरोबच डोळ्यांचे होणारे नुकसानही ही औषधे कमी करतात. 


कोलंबिया युनिव्हर्सिटीचे संशोधन 
न्‍यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी रिसर्चसाठी पाच वयस्कर लोकांना निवडले. हे सर्व एएमडी म्हणजे वयाशी संबंधित मॅक्युलर डीजनरेशनने पीडित होते. या पाचही जणांना दोन वर्षे व्हायग्राच्या दोन गोळ्या देण्यात आल्या. रिसर्चमध्ये समोर आले की, पाचपैकी चार जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होणे थांबले तर एका व्यक्तीच्या दृष्टीमध्ये सुधारणाही झाली. दोन वर्षांच्या रिसर्चनंतर वैज्ञानिक या निष्कर्षावर पोहोचले की, व्हायग्राच्या मदतीने अंधत्वावर उपचार होऊ शकतो. 

 
इशाराही दिला 
रॉयल कॉलेज ऑफ ऑप्थाल्मोलॉजिस्टच्या प्रोफेसर शोभा शिवप्रसाद म्हणाल्या की, व्हायग्राच्या या नव्या उपयोगाबाबात माहिती मिळाल्याने आनंद झाला. पण हे संशोधन छोटेखानी आहे. व्हायग्राचा औषध म्हणून वापर करण्यासाठी किंवा हे निष्कर्ष तपासून पाहण्यासाठी मोठ्या संशोधनाची गरज आहे. 

 
50 वर्षांनंतर उद्भवते एएमडीची समस्या 
एक्सपर्ट्सच्या मते, एएमडीची समस्या वयाच्या 50 व्या वर्षी सुरू होते. मॅक्युलावर नव्या रक्त वाहिन्यांची वाढ झाल्याने ती उद्भवते. या रक्तवाहिन्यांमधून पातळ पदार्थ निघतो त्याची जखम तयार होते आणि त्यामुळे डोळ्यांची दृष्टी हळू हळू कमी होऊ लागते. त्यामुळे वाचण्या, टिव्ही पाहण्यात आणी चेहरे ओखळण्यात अडचणी येतात. 

बातम्या आणखी आहेत...