आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Scientists Claims, They Have Solved Bermuda Triangle Mystery, They Are Close To The Supernatural Power Which Vanishes Airplanes And Ships

OMG: अचानक गायब का झाली विमाने अन् जहाजे, उलगडले बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - शास्त्रज्ञांचा दावा आहे की, त्यांनी जगातील सर्वात रहस्यमयी जागा बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडले आहे. दावा आहे की, बर्म्युडा ट्रँगलमध्ये आतापर्यंत गायब झालेली मोठमोठी जहाजे आणि त्यावरून जाणाऱ्या विमानांच्या दुर्घटनेमागे एखाद्या एलियन वा समुद्री दानवाचा हात नसून तेथील समुद्राचे पाणी आणि हवाच कारणीभूत आहे. यामागचे मुख्य कारण दैत्याकार समुद्री लाटा आहेत, ज्या एवढ्या उंच उठतात की, त्सुनामीही त्यासमोर छोटी ठरेल. 

 

या गोष्टी आल्या समोर...
- युनिव्हर्सिटी ऑफ साउथम्पटन द्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार, बर्म्युडा ट्रँगलमध्ये अशा लाटा तयार होतात ज्या खूप खतरनाक असतात. नॉर्थ अटलांटिकमध्ये बर्म्युडा ट्रँगल मियामी, बर्म्युडा आणि रीकोच्या दरम्यान स्थित आहे. याच कारणामुळे येथे उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूंनी एकत्रच भयंकर वादळे उठतात, ज्यामुळे दैत्याकार लाटा तयार होतात.

- या लाटा 100 फुटांच्या उंचीपर्यंत पोहोचतात. एवढी उंची जगात आतापर्यंत सर्वात उंच त्सुनामीच्या लाटेसारखी आहे. 1958 मध्ये अलास्कामध्ये आलेल्या त्सुनामीत एवढ्या ऊंच लाटेची नोंद करण्यात आली होती.

 

जेव्हा 306 जण जहाजासोबत झाले गायब
- शास्त्रज्ञांनी एक सिम्युलेटर मॉडल तयार केले, जे 1918 मध्ये बुडालेल्या यूएसएस साइक्लॉप्स जहाजासारखे होते. टेस्टमध्ये आढळले की, कशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आलेल्या लाटांमध्ये जहाज स्थिर राहू शकले नाही आणि बुडून गेले. या जहाजात तब्बल 306 जण स्वार होते. त्यांचा काहीही शोध लागला नाही. गतवर्षी आलेल्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सायक्लॉप्स जहाजाच्या डिझाइनमध्ये काही चुकाही होत्या, ज्या अशा लाटांचा सामना करण्यात सक्षम नव्हत्या.

- साइक्लॉप्सप्रमाणेच प्रोटियस आणि नीरियस जहाजही अशाच परिस्थितीत बुडाले होते. या जहाजांना बुडवण्यासाठी 50 फूट उंच लहरी पुरेशा होत्या.

 

या कारणामुळे दुर्घटनाग्रस्त झाली विमाने
- फक्त पाणीच नाही, तर बर्म्युडा ट्रँगलवरून जाणारी विमानेही गायब झालेली आहेत. येथून अनेक हजार फूट उंचीवर जाणारी विमानेही कधी-कधी गायब झालेली आहेत. काही तर अशी गायब झाली की, ज्यांचा काहीही शोध लागलेला नाही. शास्त्रज्ञांनी बर्म्युडा ट्रँगलच्या आसपासच्या वातावरणाचाही बारकाईने अभ्यास केला. रिसर्चनुसार, या ट्रँगलवरून हजारो फूट उंचीपर्यंत अतिशय वेगवान वारे वाहतात. या वाऱ्यांचा वेग 170 मैल प्रति तास असतो.


- परंतु या हवा एका दिशेने नाही, तर तिन्ही दिशांनी एकत्र येतात. यामुळे यावर याच्या वरच्या भागात चक्रीवादळासारखी स्थिती बनते. असे मानले जाते की, जेव्हा एखादे विमान यामधून जाते, तेव्हा त्याचे संतुलन बिघडते आणि थेट समुद्रात बुडून जाते.

 

काय म्हणतात यूएस कोस्ट गार्ड?
- यूएस कोस्ट गार्ड्सच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, बर्म्युडा ट्रँगल हा एक परिसर नाही, जो दिसेल. फक्त दुर्घटनांच्या आधारावर या जागेचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. आतापर्यंत जेवढ्याही दुर्घटना झाल्या आहेत, त्यांच्या चौकशीत घटनेचा कोणताही पुरावा आढळलेला नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video व आणखी Photos...

 

बातम्या आणखी आहेत...