• Home
  • Scientists Discover a Meat Eating Plant That Feeds on Salamanders in canada

International Special / कॅनाडात सापडल्या मांसभक्षी वनस्पती, वैज्ञानिकांनी 2 वर्षात अशा 202 वनस्पतींचा घेतला शोध


कॅनाडाच्या अॅल्गोनकुइन प्रोव्हिंशिअल पार्कमध्ये मांसभक्षी वनस्पती आढळले

दिव्य मराठी वेब

Jun 12,2019 04:09:28 PM IST

इंटरनॅशनल डेस्क- वैज्ञानिकांनी कॅनाडात अशा वनस्पतींचा शोध घेतला आहे, ज्या मांसाहारी आहेत. या वनस्पती पालीप्रमाणे दिसणारे जीव सॅलामँडरला खातात. कॅनाडातील उभयचर प्राण्यांचे शोध केंद्र असणाऱ्या 'अॅल्गोनकुइन प्रोव्हिंशिअल पार्कमध्ये' या वनस्पतींचा शोध लागला. तसेच, याभागात वेगवेगळे वनस्पती आणि प्राणी आढळतात.

इकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित शोधनुसार, मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी संशोधन सुरू होते. 2017 मध्ये 'युनिव्हर्सिटी ऑफ गुअल्फच्या' शोधकर्त्यांनी कॅनाडामध्ये 144 पिचर प्लॅंट आढळले, यामध्ये 8 सॅलासँडरचे सहा पिलं जिवंत आणि 2 मृत होते. त्यांनी याची माहिती नुकतीच समोर आणली आहे. इकोलॉजी जर्नलनुसार, अशा प्रकारच्या वनस्पतींची फक्त कल्पनाच केली जाऊ शकत होती. पण संशोधकांच्या कठिण परिश्रमामुळे या वनस्पती जगासमोर येण्यास मदत झाली.

वनस्पतील म्हटले जाते 'पिटफॉल ट्रॅप'
यादरम्यान संशोधकांच्या टिमने ऑग्सट आणि सप्टेंबरमध्ये अशा प्रकारच्या 58 इतर वनस्पतींचा शोध घेतला होता. यामध्ये 20 टक्के वनस्पतीमध्ये सॅलासँडर आढळले होते. पण यातील काही जीव या वनस्पतीमध्ये 19 दिवस जिवंत राहिले. तर इतर जीव काही दिवसांतच मरण पावले.

वैज्ञानिकांनुसार, या वनस्पतीला 'पिटफॉल ट्रॅप' असे म्हटले जाते. या वनस्पती ओलावा आणि कमी पोषक घटक असलेल्या जमीनीत वाढतात. तसेच, किटक आणि कोळी हे या वनस्पतीचे खाद्य आहे. यामध्ये असलेल्या विशिष्ट द्रवपदार्थाद्वारे (अमृत) किटकांची शिकार केली जाते. वनस्पतीमध्ये असलेला सुगंध आणि रंगामुळे किटक आकर्षित होतात आणि वनस्पतींजवळ आल्यावर कैद होतात.

नायट्रोजनच्या कमतरतेमुळे झाले मांसभक्षी
जमीनीत नायट्रोजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे या वनस्पती मांस खात आहेत. त्यामुळे नायट्रोजनची पूर्तता करण्यासाठी त्यांना किटक आणि जीव खावे लागतात. तसेच, संशोधकांनी फिलीपिन्समध्ये उंदिर खाणाऱ्या वनस्पतीचा शोध घेतला होता. संशोधकांच्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या वनस्पती पोषक तत्वांच्या गरजेनुसार शिकार करतात.

X
COMMENT