आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाची पाने उलगडणारा शोध, अंटार्टिकाच्या बर्फात सापडले जीवन; शास्त्रज्ञांना खोदकामात मिळाले प्राण्यांचे अवशेष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अंटार्टिका : जगातील सर्वांत थंड प्रदेश असलेल्या अंटार्टिकामध्ये लागलेल्या शोधामुळे शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहे. बर्फाच्छदित असलेल्या महाद्वीपावर शास्त्रज्ञांना एका उपग्रहाद्वारे एक तलाव दिसला होता. या गोठलेल्या तलावावर त्यांनी खोदकाम सुरु केले. त्यानंतर हजारो वर्षापू्र्वीचे रहस्य त्यांच्यासमोर आले. तब्बल 3500 फूट खोल खाली हजारो वर्षापू्र्वीच्या जुन्या प्राण्यांचे मृतदेह आढळून आले.  


> रिपोर्ट्सनुसार हा परिसर पूर्णपणे गोठलेला आहे. शास्त्रज्ञांना या भागात आतापर्यंत गोष्टी आणि किस्से ऐकलेले क्रसटेशियन आणि टाडिग्रेड नावाचे प्राणी सापडले आहेत. संशोधनानंतर ते पाण्यात राहणारे अस्वल असल्याचे माहीत झाले.  


येथे कशाप्रकारे आले असलीत हे प्राणी...

> आतापर्यंत सांगण्यात येत होते की, अंटार्टिकावरी अतिथंड वातावरणामुळे याठिकाणी जीवन अस्तित्वात नाही. पण या प्राण्यांचे अवशेष मिळाल्यानंतर येथेही जीवन असल्याची कल्पना करण्यात येत आहे. 

 

> युनिव्हर्सिटी ऑफ लिंकन येथील डेविड हारवुड यांनी सांगितले की, "आम्हाला याठिकाणी अशाप्रकारेच प्राणी सापडतील याबाबत कधी विचार केला नव्हता. आमची टीम हैराण झाली की, हे जीव येथे कसे आले असतील. पण एका कारणामुळे हे होऊ शकते. अंटार्टिकावर 10 हजार वर्ष ते 1 लाख 20 हजार वर्षापू्र्वी साधारण वातावरण होते. तेव्हा हे प्राणी येथील डोंगरालगत असलेल्या तलावात वास्तव्य करत असावेत आणि मग याठिकाणी आले असावेत. पण येथील वातावरण थंड झाल्यानंतर ते येथे अडकले असतील."

बातम्या आणखी आहेत...