आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रज्ञांना डोंगरावर आढळला रहस्यमयी खड्डा, गिझाचे दोन पिरामिड मावण्याइतकी होती जागा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेंगशिन- चीनच्या फेंगशिनमध्ये असलेल्या डोंगरात शास्त्रज्ञांनी एका रहस्यमयी खड्याचा शोध लावला आहे. या वर्षीच ऑक्टोबरमध्ये काही चीनी शास्त्रज्ञ याठिकाणावरून हेलिकॉप्टरने जात होते त्यावेळस त्यांना डोंगराच्यावर एक रहस्यमयी मोठा खड्डा दिसला. हा खड्डा मोठा होता त्यामुळे यांना कळाले की ही ज्वालामुखी नाहीये. मग इतका मोठा खड्डा डोंगरावर झाला कसकाय आणि यात काय असेल? याचे उत्तर मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालून त्यांनी आत जाण्याचा निर्णय घेतला. आत गेल्यावर त्याची खोली संपायचे नावच घेत नव्हती...

- 4 ऑक्टोबरला 2 शास्त्रज्ञ दोरीच्या साहाय्याने आत उतरले. खड्डा खुप खोल होता त्याचे तळ त्यांना सापडतच नव्हता. 

 

400 फूटानंतर दिसला उजेड

- अंदाजे 400 फूट खोल उतरल्यानंतर त्यांना थोडासा उजेड दिसला. तेथील दृष्य पाहून ते हैरान झाले. डोंगराच्या आत एक भीमकाय गुफा होती. याचा अर्थ हा होता की, डोंगर आतून पोकळ आहे, फक्त बाह्य अवरणावर तो संपूर्ण डोंगर उभा होता.

 

इतकी मोठी होती गुफा की, पिरामीड सामाउन जाईल

दोघांनी वॉकी-टॉकीच्या मदतीने टीमला आत बोलवले आणि हैरान करणारी बाब समोर आली. चाइनीज अकॅडमी आणि जियोलॉजिकल सायंसच्या रिपोर्टनुसार त्या गुफेमध्ये 650 फूटाची जागा होती. त्या गुफेत अशा दोन जागा होत्या, त्या जागांना 3D स्कॅनरने स्कॅन केल्यावर कळाले की, त्या जागेत गिझाचे दोन पिरामीड मावतील इतकी मोठी जागा त्यात होती. 

 

नदीपर्यंत जातो रस्ता
- सगळ्यात हैरान करणारी गोष्ट म्हणजे त्या गुफेत एक भुयार मिळाले जे पानयांग नदीपर्यंत जाते. शास्त्रज्ञांचे म्हणने आहे की येथून एका चॅनेलच्या माध्यामातून पानयांग नदीपर्यंत पाऊसाचे पाणी जाते. 

 

बातम्या आणखी आहेत...