Home | International | Other Country | Scientists unearth body of young witch buried 1600 year ago, villagers shocked

1600 वर्षांपूर्वी जिवंत गाडली होती ही चेटकीण; कबर खोदताच दिसले असे काही, अख्खे गाव हादरले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 10:40 AM IST

आता आपल्या गावावर संकट येणार अशी भीती गावकऱ्यांमध्ये पसरली.

 • Scientists unearth body of young witch buried 1600 year ago, villagers shocked

  कीव्ह - युक्रेनच्या लेहेडझाईन नामक एका गावात एका नव्या संशोधनानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील नॅशनल सायंस इंस्टिट्युटच्या दोन शास्त्रज्ञांनी एक 1600 वर्षांपूर्वीची कबर खोदली. ती कबर एका चेटकिणीची होती. त्यावेळी काळी जादू करत असल्याप्रकरणी गावकऱ्यांनी तिला मारहाण करून जिवंत पुरले होते. कबर खोदल्यानंतर आतील दृश्य पाहून सगळेच घाबरले. कबरीत असे काही मिळेल याची संशोधकांना सुद्धा कल्पना नव्हती. आता आपल्या गावावर संकट येणार अशी भीती गावकऱ्यांमध्ये पसरली आहे.


  आत होते असे काही...
  > युक्रेनच्या National Academy of Sciences विद्यापीठातील पुरातत्व विभागाचे संशोधक बोरिस महामेदोव आणि सेरही दिदेनको यांनी कबरीचे खोदकाम केले. आत 1600 वर्षांपूर्वी दफन केलेली बॉडी होती. त्यामुळे, अगदी बारकाईने किंचीतही धक्का न लावता मृतदेह उकेरण्यात आले. मृतदेहावरील माती हटवली तेव्हा सांगाड्याची अवस्था पाहून सगळेच हादरले.
  > आत एका महिलेचा सांगाडा होता. तिला खड्ड्यात उलटे ढकलून जिवंत पुरण्यात आले होते. तत्पूर्वी तिचे दोन्ही हात मागून बांधण्यात आले होते. 1600 वर्षांपूर्वी बांधलेले तिचे हात अजुनही तसेच होते. ती उलटी पडली तरीही तिचे तोंड डावीकडे होते आणि ती लोकांना दयेची भीक मागत होती असे दिसून येते.
  > तिला अशा पद्धतीने का पुरण्यात आले त्याचेही कारण पुरातत्ववेदतांनी दिले आहे. चेटकीण असल्याचे आरोप लागल्यानंतर लोक महिलांची हत्या करायचे. काही वेळा जिवंत जाळून तर काही वेळा जिवंत पुरले जायचे. अशा चेटकिणी मेल्यानंतरही भूत होऊन परत येतील अशी भीती होती. त्यांच्या परतीचे मार्ग बंद करण्यासाठी त्यांना मारण्यापूर्वी हात उलटे बांधले जायचे. असे केल्याने ते परत येणार नाहीत असा त्यांचा समज होता.


  महिलांना चेटकीण सिद्ध करण्यामागचे घाणेरडे सत्य...
  युक्रेनमध्ये सापडलेल्या या चेटकिणीचे वय मरताना फक्त 25 वर्षे होते. तिच्यावर एका धनाढ्य व्यक्तीने काळी जादू करत असल्याचे आरोप लावले होते. त्यावरूनच गावकऱ्यांनी स्थानिक धर्मगुरूच्या मदतीने तिला अशा पद्धतीने जिवंत पुरले होते. त्या काळात चेटकीण असल्याचे आरोप लावून महिलांची हत्या करणे हे धनाढ्य आणि त्या-त्या भागात दबदबा असलेल्या पुरुषांचेच कट होते. त्यावेळी धनाढ्य पुरुष एखाद्या महिलेवर अत्याचार करायचे. किंवा प्रेमात दगा द्यायचे आणि पीडितेला चेटकीण सिद्ध करण्याचा कटकारस्थान करायचे. कुठल्याही महिलेवर चेटकीण असल्याचा आरोप लागला तर तिचा मृत्यू अटळ होता. अनेकवेळा विवाहित महिला किंवा प्रेयसीने धोका दिल्यास तिला सुद्धा चेटकीण म्हणून अशाच स्वरुपाच्या शिक्षा दिल्या जात होत्या. ही महिला देखील त्यापैकीच एक असेल याची शक्यता नकारता येत नाही.

 • Scientists unearth body of young witch buried 1600 year ago, villagers shocked
 • Scientists unearth body of young witch buried 1600 year ago, villagers shocked

Trending