Home | Khabrein Jara Hat Ke | Scotland beach airport, where airplanes land on beach

जगातील एकमात्र विमानतळ जेथे समुद्र किनाऱ्यावर उतरतात विमाने, लाटांची भरती आल्यानंतर लँडिंग थांबवण्यात येते

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 23, 2019, 03:21 PM IST

स्कॉटलंडच्या बारा बेटावर आहे हे एअरपोर्ट, वादळादरम्यान विमानतळ बंद करण्यात येते

  • लंडन - स्कॉटलंडच्या बारा द्वीप येथील विमानतळ स्वतःच एक वैशिष्ट्य आहे. उत्तर अटलांटिक महासागराच्या तटावर असलेल्या विमानतळावर रनवे नाही. येथे समुद्र किनाऱ्यावरच विमानाचे लँडिंग करण्यात येते. याठिकाणा लाटांची भरती आल्यानंतर विमानाची लँडिंग थांबवण्यात येते.


    इतर ठिकाणांशी जोडलेले आहे एअरपोर्ट

    > बारा जगातील एकमात्र असे विमानतळ जेथे शेड्यूल फ्लाइट्स लँड करतात. हे विमानतळ ग्लासगो एअरपोर्टसोबत जोडलेले आहे. समुद्री वादळादरम्यान एअरपोर्ट बंद करण्यात येऊन येथील उड्डाणे रद्द केली जातात.


    > बारा एअरपोर्टवर जास्त करून लहान विमाने (20 मीटर) उतरतात. येथे दररोज स्कॉटिश एअरलाइनचे दोन फ्लाइट्स येत असतात. हे विमानं किनाऱ्यावरील वाळूवरच उतरवली जातात. याठिकाणी कोणत्याही प्रकारचा रनवे तयार करण्यात आलेला नाही.


    > किनाऱ्याजवळ टर्मिनलसाठी एक छोटीशी इमारत उभारण्यात आली आहे. एअरक्राफ्टहून इमारतीपर्यंत जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पूल किंवा धावपट्टी निर्माण केलेली नाही.

Trending