आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्ट मागून स्कूटीचालकास थांबवले, काेयत्याने वार करून पळवली स्कूटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -स्कूटीचालकास लिफ्ट मागून लघवी करण्याच्या बहाण्याने स्कूटी थांबवून कोयत्याने पाठीवर, हातावर वार करून स्कूटी पळवून नेणाऱ्यास बदनापूर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत ताब्यात घेतले आहे. रामेश्वर पांडुरंग भोसले (काजळा, ता. बदनापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ६० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

सायगाव येथील पोस्टमन संजय माणिकराव जाधव हे स्कूटीवरून गावाकडे जात होते. दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेल्या रामेश्वर भोसले याने हात दिला असता, जाधव यांनी लिफ्ट दिली. यानंतर पुढे काही अंतरावर गेल्यानंतर रामेश्वर भोसले याने लघवी आली म्हणून दुचाकी थांबवण्यासाठी विनंती केली. यानंतर भोसले याने जाधव यांच्या पाठीवर कोयत्याने वार करून स्कूटी घेऊन पळून गेल्याची घटना बुधवारी घडली होती.

 

या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गोपनीय यंत्रणा लावून हा तपास लावत औरंगाबादच्या रेल्वे स्थानक परिसरात आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, उपनिरीक्षक चैनसिंग घुसिंगे, पोलिस कॉन्स्टेबल चरणसिंग बमनावत यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...