Home | National | Other State | sdm sanjeev sahu two year old son died of unknown reasons in damoh madhya pradesh

2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आई वडिलांचा यावर बसत नव्हता विश्वास, मृत घोषित केल्यानंतरही प्रेत घेऊन गेले पुन्हा हॉस्पिटलमध्ये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 06:08 PM IST

मृत मूलगा पुन्हा जिवंत होण्याच्या आशेने आई चोळत होती हात-पाय

 • दमोह(म. प्र.) - एसएमडी साहू यांच्या मुलाचे बुधवारी निधन झाले. आईबरोबर अंथरुणात झोपलेला असताना तो अचानक सकाळी बेशुद्ध झाला. नातेवाईक त्याला उपचारांसाठी तत्काळ डॉ. त्रिवेदी यांच्याकडे घेऊन गेले. डॉ. त्रिवेदींनी त्यावर उपचार केले पण जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

  जीवंत होण्याच्या आशेने पुन्हा घेऊन आले आई वडील
  एसएमडी साहू 2 वर्षांच्या त्यांच्या मुलाचे प्रेत घेऊन घरी आले. पुन्हा काही वेळानंतर पत्नीला घेऊन हॉस्पिटल मध्ये पोहचले. त्यांची पत्नी हॉस्पिटल मध्ये पोहचल्यानंतर मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवावे अशी वारंवार हात जोडून विनवणी करत होती. परंतु त्यांचा मुलगा मृत असल्याने डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवण्यास नकार दिला. डॉक्टरांना विरोध करत साहू मुलाला व्हेंटिलेटर वर ठेवावे असेच म्हणत होते. त्यानंतर एसएनसीयू वार्ड मध्ये त्यास हलविण्यात आले. पण तेथेही इतर मुलांबरोबर त्याला ठेवणे अशक्य होते.

  वारंवार सांगूनही ऐकत नव्हते एसडीएम
  डॉक्टर नामदेव यांनी आयुक्तांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यांनी आयुक्तांना सांगितले. मुलगा मृत असल्याचे सांगूनही एसडीएम ऐकत नसून मृत मुलाला व्हेंटिलेरवर ठेवावे असा हट्ट धरून आहेत आणि ते शक्य नाही. यावर आयुक्तांनी सांगितले मुलाला आईसीयु वार्ड मध्ये शिफ्ट करावे. तेथे शिफ्ट केल्यानंतरही बराच वेळ श्वासोच्छ्वास सुरळीत होण्यासाठी डॉक्टरांना प्रयत्न केले. परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. साहू पुन्हा मुलाचे प्रेत घेवून घरी आले. डॉक्टर नामदेव यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगितले त्यांच्या मुलाचा मृत्यू घरीच झाला होता. पण नातेवाईक मान्य करण्यास तयार नव्हते.


  मृत मुलगा जिवंत होण्याच्या आशेने आई चोळत होती हात-पाय
  एकदा घरी गेल्यानंतर एसडीएम साहू पुन्हा मुलाला घेऊन दवाखान्यात गेले. त्या दरम्यान त्यांनी मुलाच्या जवळ बसून हात - पाय घासून मालीश केली पण त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मुलाचे नाव आरुष असे होते. एक दिवस आधीच त्याचा वाढदिवस देखील होता. सर्व सदस्य आनंदी वातावरणात असतांना अशी दुःखद घटना घडल्याने कोणाचाही यावर विश्वास बसत नव्हता.

 • sdm sanjeev sahu two year old son died of unknown reasons in damoh madhya pradesh
 • sdm sanjeev sahu two year old son died of unknown reasons in damoh madhya pradesh

Trending