आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : नाल्यात पडलेल्या दिव्यांशचा तिसऱ्या दिवशीही शोध नाही, मुलाच्या वडिलांनी दिला आत्महत्येचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गोरेगावातील आंबेडकर नगरमध्ये बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास नाल्यात पडलेल्या दोव वर्षीय दिव्यांशचा तिसऱ्या दिवशीही शोध लागला नाही. मुलाच्या शोध घेण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. याअगोदर अग्निशमन दल, पोलिस आणि मुंबई महानगरपालिकेची टीम दिव्यांशच्या शोधकार्यात जुडली होती. दरम्यान मुलाचे वडील सुरज सिंह यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, की या दुर्घटनेसाठी बीएमसी जबाबदार आहे. काही तासांत मला माझा मुलगा मिळाल नाही तर मी आत्महत्या करेन. 


तक्रार देऊनही झाली नाही कारवाई
स्थानिक लोकांनी गेल्या वर्षांत अनेकवेळा उघड्या नाल्याबाबत बीएमसीकडे तक्रार केली होती. पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर आजचा दिवस पहावा लागत आहे. घटनास्थळी दाखल झालेले मुंबईचे महापौर महादेश्‍वर यांनी दिव्यांशच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यातील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. 


अशी घडली घटना 
बुधवारी रात्री दोन वर्षीय दिव्यांश घराबाहेर खेळत होता. घरी जात असताना त्याचा पाय घसरून तो नाल्यात पडला. त्याची आई त्याला शोधण्यासाठी बाहेर आली. पण नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे दिव्यांशचा पत्ता लागला नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दिव्यांश उघड्या नाल्यात पडताना दिसले. 


 

5 वर्षांत अशाप्रकारच्या 639 दुर्घटना 
आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद यांच्या मते, गेल्या साडे पाच वर्षांत मुंबईत मॅनहोल/नाला/समुद्रात एकूण 639 दुर्घटनांमध्ये 328 लोकांना आपले प्राण गमवावे लागले.