आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-वेस्ट इंडीजमधील दुसरी व अखेरची कसोटी आजपासून; सामना बरोबरीत राहिल्यास भारत सलग आठवी मालिका जिंकणार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंग्सटन - भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीला शुक्रवारी किंगस्टन येथे सुरुवात होत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने १-० ने आघाडी घेतली. हा सामना बरोबरीत राहिल्यास टीम इंडिया विंडीज विरुद्ध सलग आठ कसोटी मालिका जिंकले. विंडीजची टीम १७ वर्षापासून भारताविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकू शकली नाही. अखेरच्या वेळी त्यांनी २००२ मध्ये आपल्या मायदेशात  पाच सामन्याच्या मालिकेत २-१ ने बाजी मारली होती. त्यानंतर सलग ७ मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी भारतीय संघाने टी-२० मालिका ३-० आणि वनडे मालिका २-० ने जिंकली आहे. 

अखेरच्या २२ सामन्यांत विंडीजने एकही विजय मिळवला नाही
विंडीज टीम भारताविरुद्ध अखेरच्या २२ कसोटीत एकही विजय मिळवू शकला नाही. त्यांचा १३ सामन्यात पराभव आणि ८ सामने बरोबरी राहिले.

भारताने जर ही मालिका जिंकली, तर विंडीजमध्ये सलग चौथी मालिका आपल्या नावे करेल. दोन्ही संघात एकूण २४ कसोटी मालिका झाल्या आहेत. विंडीज टीमने १२ आणि टीम इंडियाने ९ मालिका जिंकल्या. २ मालिका बरोबरी राहिल्या. ही मालिका कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दोघांची पहिली मालिका आहे. टीम इंडिया ६० गुणांसह अव्वलस्थानी आहे. विंडीज टीमने आपले खातेही उघडले नाही.
 

कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार 
भारताने हा सामना जिंकला, तर विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनेल. कोहली आणि धोनी सध्या संयुक्तरीत्या २७-२७ सामने जिंकून अव्वलस्थानी आहेत. कसोटीत भारताकडून केवळ तीनच कर्णधार २० पेक्षा अधिक सामने जिंकू शकले आहेत.  माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या नेतृत्वात २१ सामने जिंकले. दुसरीकडे सचिन कर्णधार म्हणून यशस्वी ठरला नाही. तो २५ सामन्यात केवळ ४ विजय मिळवून देऊ शकला.  त्याच्या नेतृत्वात भारताला समाधानकारक कामगिरी करता अाली नाही.

या मैदानावर विंडीजने आपल्याला ६ वेळा हरवले 
किंग्सटन मैदानावर विंडीजचा रेकॉर्ड भारता विरुद्ध चांगला आहे. दोघांत या मैदानावर एकूण १२ सामने झाले आहेत. भारताने केवळ २ आणि विंडीजने ६ विजय मिळवले. ४ सामने बरोबरीत सुटले. अखेरच्या वेळी जुलै २०१६ मध्ये झालेला सामना बरोबरीत राहिला.
 

पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाजांच्या १८ विकेट 
पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाजांनी १८ विकेट घेतल्या. दुसऱ्या कसोटीत टीम इंडियासाठी तीन वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह व मो. शमी यांना पुन्हा चांगली कामगिरी करावी लागेल. या तीन गोलंदाजांनी २० पैकी १८ बळी घेतले. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने २ फलंदाज टिपले. ईशांतने ८ आणि बुमराहने ६ गडी बाद केले. या सामन्यात अंतिम अकरात बदल होण्याची शक्यता कमी आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला आपल्या खेळात सुधारणा करावी लागेल. चेतेश्वर पुजारा देखील फार्मात नाही. अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीने चांगले प्रदर्शन केले. 
 

गत तीन वर्षांत जडेजाची सरासरी अश्विनपेक्षा चांगली :
पहिल्या कसोटीत अश्विनला बाहेर केल्यावर माजी कर्णधार सुनील गावसकरने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  रेकॉर्ड पहाता कसोटीत जडेजाची सरासरी अश्विनपेक्षा सरस आहे. सप्टेंबर २०१६ पासून आजपर्यंत ऑफ स्पिनर आर. अश्विनने २९ सामन्यात २६ च्या सरासरीने १४९ बळी घेतले. दुसरीकडे जडेजाने २५ सामन्यात २४ व्या सरासरीने १२३ विकेट घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे फलंदाजीत जडेजाने यादरम्यान १० अर्धशतके आणि एक शतकासह १०४९ धावा काढल्या.