आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - मनी लाँडरिंगच्या माध्यमातून विदेशात बेनामी संपत्ती खरेदी करण्याच्या आरोपावरून ईडीने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची चौकशी केली. गुरुवारी तब्बल नऊ तास चौकशी चालली. सकाळी सुमारे ११.२५ वाजता ईडीच्या जामनगर येथील कार्यालयात आलेले वढेरा यांना रात्री सुमारे साडेनऊ वाजता प्रियंका आपल्या सोबत घेऊन गेल्या. दुपारी जेवणासाठी एक तास ते ईडीच्या कार्यालयाबाहेर गेले होते. वढेरा यांना शनिवारी सकाळी १०.३० वाजता चौकशीसाठी पुन्हा बोलावले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले, ईडीच्या ताब्यात असलेली कागदपत्रे दाखवून वढेरा यांना प्रश्न विचारण्यात आले. शस्त्रास्त्रांचा व्यापारी संजय भंडारी यांच्याशी असलेल्या संबंधाचा माग घेण्यात आला. सूत्रांच्या मते, वढेरा यांनी काही कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांकडे दिली आहेत. तसेच उपलब्धतेनुसार अन्य कागदपत्रेही देण्याचे आश्वासन दिले. इंग्लंडमधील कथित स्थावर मालमत्ता खरेदी प्रकरणात ईडीकडून वढेरा यांची चौकशी होत आहे. वढेरा यांच्यावरील अंतरिम जामीन याचिकेवर कोर्टाने २ फेब्रुवारीला त्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अटक करता येणार नाही, असे सांगत त्यांना ईडीसमोर मात्र नियमित हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
भाजपने जारी केले वढेरा आणि चढ्ढा यांचे नऊ ई-मेल
राजकीय सुडापोटी वढेरा यांची चौकशी होत असल्याचे सांगणाऱ्या काँग्रेसवर हल्ला चढवताना भाजपकडून गुरुवारी वढेरा आणि शस्त्र व्यापारी संजय भंडारी याचा नातेवाईक सुमीत चढ्ढा यांच्यातील नऊ ई-मेल जारी केले. हे ई-मेल ८ मार्च २०१० ते १७ एप्रिल २०१० या काळातील आहेत. गांधी कुटुंबाच्या लंडनमध्ये पाच मालमत्ता असल्याचा आरोपही भाजपचे संबित पात्रा यांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.