आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात स्वाइन फ्लूने आठवड्यात दुसरा बळी; शमीम बागवान यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरात स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी गेला आहे. शमीम अ.कादर बागवान (वय ४०, रा. एकता नगर) यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना अश्विनी रुग्णालयात १९ रोजी रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांची एच १ एन १ तपासणी केली असता पॉझीटिव्ह आली. दोन दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी शमीम यांचा मृत्यू झाला. सोमवारी हमीदबी रियाज अहमद शेख (वय ४२, रा. लष्कर) यांचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. स्वाइन फ्लूमुळे आठवड्यात हा दुसरा बळी गेला. 


पालिकेची खबरदारी, संशयितांची तपासणी 
शहरात हा दुसरा स्वाइन फ्लूचा बळी आहे. पालिकेकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. धूर फवारणी करण्यात येत आहे. परिसरातील संशयितांची पाहणी केली जात आहे. सर्दी, खोकला, ताप वा श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यास लगेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.

- डॉ. संतोष नवले, आरोग्य अधिकारी 

बातम्या आणखी आहेत...