आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑटो डेस्क - सेकंड हँड कार खरेदी करण्यसाठी भारताच्या अनेक शहरांत याचे मोठी बाजारपेठ
आहे. मुंबई, अहमदाबाद, कलकत्ता यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये या कार अनेक पटीने स्वस्त मिळतात. दिल्लीतील एका ठिकाणी देखील अशाच प्रकारचे मार्केट आहे. येथे मात्र 60 हजार रूपयांत चांगली प्रतीची सेकंड हँड कार खरेदी करता येते. शोरूम वॅगरआर कारची ऑनरोड किंमत 5.69 लाख रुपये आहे. पण याठिकाणी चांगल्या कंडीशनमधील सेकंड हँड कार फक्त 60 हजार रुपयांत मिळते.
येथे आहे मार्केट
> दिल्लीतील करोल बाग येथील जल बोर्डजवळ हा बाजार आहे. येथे मारुतीपासून महिंद्रा, फोर्ड, हुंदाई, वोक्सवॅगन यांसह अनेक ब्रँडच्या कार उपलब्ध आहेत. दिससायला या कार चांगल्या कंडीशनमध्ये असतात. या गाड्यांवर कोणत्याही प्रकारचा डेंट नसतो. कारचे मॉडल जितके जुने असते तितकी त्याची किंमत कमी होते.
फायनेंसची सुविधा देखील उपलब्ध
> या मार्केटमधील सेकंड हँड कारचे डिलर्स SSS Ji Car Bike & Properties ने सांगितले की, येथे 60 रुपयांपासून सेकंड हँड कार मिळतात. या कार घेण्यासाठी फायनेंसही करता येते. कारसोबत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देखील देण्यात येते. यामुळे या कारबाबत कोणताही गैरव्यवहार होण्याचा शक्यता नाही. तुम्ही कारच्या किंमतीबाबत बारगेनिंग करू शकता.
या गोष्टींची काळजी घ्या
> तुम्ही जर या मार्केटमध्ये कार खरेदी करण्यासाठी जाणार आहात तर तुम्हाला कारच्या सर्व पार्ट्स विषयी ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण या कार घेताना त्यांच्या पार्ट्स विशेष करून इंजिनमध्ये खराबी असू शकते. याव्यतिरिक्त कारचे पार्ट हे बनावट असू शकतात. अशावेळी तुम्ही एखाद्या कार एक्सपर्ट किंवा मेकॅनिक घेऊन जाणे फायदेशीर ठरेल.
सेकंड हँड कारच्या किमती
> मारुती वॅगनआर : 60 हजार रूपये
> टाटा नॅनो : 60 हजार रूपये
> हुंदाई सेंट्रो : 60 हजार रूपये
> मारुती सुझुकी अल्टो : 1 लाख रूपये
> शेवरले बीट : 1.9 लाख रूपये
नोट : सदर सांगितलेली रक्कम ही कमी-जास्त असू शकते. इतकेच नाही तर, दाखवेलल्या रकमेत तुम्ही बारगेनिंग करून त्यापेक्षा कमी किमतीत कार खरेदी करू शकता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.