Home | National | Delhi | Second Hand or Used car option to purchase SUV

50% किमतीत विकल्या जात आहेत यूज्ड SUV, स्कॉर्पियोपासून फॉर्च्युनरपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 12:14 PM IST

अनेकदा बजेटमुळे एसयूव्ही घेणे शक्य होत नाही. पण सेकंड हँड मार्केटमध्ये ही अडचण बर्याच अंशी दूर होते.

 • Second Hand or Used car option to purchase SUV

  नवी दिल्ली - भारतीय बाजारपेठेमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्सची मागणी सर्वात वेगाने वाढत आहे. हॅचबॅकऐवजी ग्राहक सेडान किंवा एसयूव्ही कार वापरणे पसंत करतात. पण अनेकदा बजेटमुळे एसयूव्ही घेणे शक्य होत नाही. पण सेकंड हँड मार्केटमध्ये ही अडचण बर्याच अंशी दूर होते. याठिकाणी या कार 25 ते 50 टक्के कमी दरावर खरेदी करता येतात.

  सर्टि‍फाइड यूज्ड कार खरेदीचा पर्याय
  सेकंड हँड कार घेण्यासाठी ड्रूम, कारदेखो यांच्याबरोबरच टोयोटाच्या टोयोटा ट्रस्‍ट, महिंद्राच्या फर्स्‍ट चॉइस आणि मारुती सुजुकी इंडि‍याच्या ट्रूव्हॅल्‍यू याठिकाणीही सर्टि‍फाइड कार खरेदी करता येतात. येथे कारची संपूर्ण पाहणी केल्यानंतरच ती ग्राहकाला विकली जाते. तसेच त्यासाठी फायनान्सही केले जाते. या कंपन्यांमार्फत खरेदी करता येतील अशा काही कार आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगत आहोत. साधारणपणे त्या 4 ते 5 वर्षे जुन्या असतात.

  महिंद्रा स्‍कॉर्पि‍यो
  महिंद्राची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात प्रसिद्ध एसयूव्ही स्‍कॉर्पि‍यो या मार्केटमध्ये स्वस्तात खरेदी करता येते. या कारमध्ये 140 बीएचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. तसेच इंजीन 6 स्पीड गीअरबॉक्ससह येते. जवळपास 4.50 लाखांपर्यंत ती मिळते.


  पुढे वाचा- फॉर्च्युनर, सफारी आणि बोलेरोच्या किमतीबाबत..

 • Second Hand or Used car option to purchase SUV

  टोयोटा फॉर्च्‍युनर
  टोयोटाची प्रसिद्ध एसयूव्ही फॉर्च्‍यूनरही तुम्ही सेकंड हँड मार्केटमध्ये अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. फॉर्च्‍युनरची ए एक्‍स शोरूम किंमत 26.69 लाख आहे पण याठिकाणी ती 15.50 लाखांत खरेदी करता येते. 


   

 • Second Hand or Used car option to purchase SUV

  टाटा सफारी
  टाटा मोटर्सची प्रसिद्ध सफारी स्ट्रोमही खरेदी करू शकता. हिची सुरुवात 10.84 लाखांपासून पुढे आहे. पण सेकंड हँड मार्केटमध्ये ही कार तुम्हाल 4.5 ते 6 लाख रुपयांत मिळेल. 


   

 • Second Hand or Used car option to purchase SUV

  बोलेरो 
  महिंद्रा अँड महिंद्रा (एमअॅण्डएम) ची सर्वात प्रसिद्ध एसयुव्ही बोलेरोची यूझ्ड कार मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. बोलेरोचे  बीएस-4 नॉर्म्‍सचे मॉडेल कमी पैशात सहजपणे खरेदी करता येऊ शकते. या कारमध्ये 2523 सीसी इंजीन लावलेले आहे. त्यापासून 46.3 केडब्‍ल्‍यू पॉवर आणि 195 एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता मिळते. या कारची एक्स शोरूम किंमत 7.75 लाखांपासून आहे. ती यूज्ड मार्केटमध्ये 5.50 लाखांत खरेदी करता येऊ शकते. 

Trending