आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Second List Of 'AAP' Announced For Maharashtra Assembly Elections, 7 Candidates Nominated In List

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ची दुसरी यादी जाहीर, यादीत 7 उमेदवारांची नावे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आम आदमी पक्ष पुढे आहे. आपने आता आपली दुसरी यादीही जाहीर केली आहे. मीरा रोड, जालना, मुंब्रा कळव्या, शिवाजी नगरसह सात मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. 


मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपने याआधीही आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. आता दुसऱ्या उमेदवार यादीत 7 जणांना तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तीन, कोकणातील दोन, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रत्येकी एका मतदारसंघाचा समावेश आहे.आपची 7 उमेदवारांची दुसरी यादी
1. कैलास फुलारी- जालना
2. नरेंद्र भांबवानी- मीरा रोड(ठाणे)
3. डॉ. अल्तामाश फैजी- मुंब्रा कळवा(ठाणे)
4. गणेश धमाले- बडगावंशरी (पुणे)
5.मुकुंद किर्दत- शिवाजी नगर(पुणे)
6. अॅड. खतीब वकील- मध्य सोलापूर
7. डॉ. सुनील गावित- नवापूर (नंदुरबार)आप महाराष्ट्रात 50-55 जागा लढवणार
आपच्या महाराष्ट्र संयोजक प्रीती मेनन यांनी पक्ष महाराष्ट्रात 50 जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्रातून 600 ते 700 अर्ज आले, त्यापैकी 600 उमेदवारांचे अर्ज घेतले. शेवटी सर्व अर्जांची तपासणी करुन यादी तयार करण्यात आली आहे. आप आगामी विधानसभेत 50 ते 55 जागा लढवणार.