आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर... शिंदे, माने, भुजबळ, जानकर यांना उमेदवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा - Divya Marathi
दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. नांदगावमधून छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ, कर्जतमधून सुरेश लाड, माढातून बबनदादा शिंदे, मोहोळमधून यशवंत माने यांसह 20 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

दरम्यान राष्ट्रवादीने बुधवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकून 77 जणांना उमेदवारी देण्यात आली. या विशेष म्हणजे शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचा समावेश आहे. रोहित पवारांना कर्जत-जामखेडमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान अनेक तरुण व नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने त्यांनी भाजप व शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. 
 

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी
जळगाव शहर – अभिषेक पाटील
बाळापूर – संग्राम गावडे
कारंजा – प्रकाश डहाके
मेळघाट – केवळराम काळे
अहेरी – धर्मरावबाबा आत्राम
दिग्रस – मो. तारीक मो. शमी
गंगाखेड – डॉ. मधूसुदन केंद्रे
कन्नड – संतोष कोल्हे
नांदगाव – पंकज भुजबळ
बागलान – दीपिका चव्हाण
देवळाली – सरोज अहिरे
कर्जत – सुरेश लाड
खेड आळंदी – दिलीप मोहिते
मावळ – सुनिल शेळके
पिंपरी – सुलक्षणा शिलावंत
आष्टी – बाळासाहेब आजबे
माढा – बबनदादा शिंदे
मोहोळ – यशवंत माने
माळशिरस – उत्तमराव जानकर
चंदगड – राजेश नरसिंग पाटील