Home | Maharashtra | Vidarva | Akola | second marriage, while being first wife

पहिली पत्नी असताना केले दुसरे लग्न, दुसरीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी | Update - Aug 22, 2018, 01:03 PM IST

पहिली पत्नी असतानाही एका विधवा महिलेला प्रेमजाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर तिला मानसिक त्रासासोबत तिच्यावर अ

  • second marriage, while being first wife

    बोरगाव मंजू- पहिली पत्नी असतानाही एका विधवा महिलेला प्रेमजाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर तिला मानसिक त्रासासोबत तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. शेवटी पिडीत महिलेने बोरगाव मंजू पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.


    बोरगाव मंजू येथील एका विधवा महिलेला निपाणा येथील प्रवीण इंगळे याने आधी लग्न झालेले असतानाही प्रेमजाळ्यात अडकवले. तिच्यासोबत एका धार्मिकस्थळी लग्न केले. तिला घेऊन तो पुण्याला गेला, तेथे भाड्याने राहू लागला. परंतु, या ठिकाणी त्याने या महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच पतीच्या कुटुंबातील दोन सदस्यांनी तिला मानसिक त्रास दिला. शेवटी ती माहेरी बोरगाव मंजू येथे आली. परंतु, येथेही तिला पती धमक्या देऊ लागला. अखेर या महिलेने बोरगाव मंजू पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी फरार आहे. आरोपी शोधण्याचे काम पोलिस करत असल्याची माहिती ठाणेदार विजय मगर यांनी दिली आहे.

Trending