आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया विरोधात दुसरा वन डे उद्या, टीम इंडियाचा पराभव झाला तर ऑस्ट्रेलियात सात वर्षातील चौथा मालिका पराभव 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला आहे. आता दुसरा सामना मंगळवारी अॅडिलेडमध्ये होत आहे. हा सामना जिंकणे भारतासाठी गरजेचे आहे. कारण भारताचा पराभव झाल्यास तीन मोठे तोटे होऊ शकतात. पहिला म्हणजे, ऑस्ट्रेलियाला मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी मिळेल. दूसरा-वर्ल्ड कपच्या तयारीला मोठा धक्का बसेल, कारण आता 11 वनडेनंतर थेट वर्ल्डकपमध्ये खेळायचे आहे. त्यामुळे आणखी एका पराभवाने भारताच्या कमकुवत बाजू समोर दिसतील. तिसरे म्हणजे भारत 7 वर्षात ऑस्ट्रेलियात चौथी मालिका गमावणार आहे. यापूर्वी सीबी सीरीज 2012, ट्राएंगुलर सीरीज 2015 आणि 2016 ची दुहेरी मालिका भारताने गमावली आहे. 

 
2012 मध्ये धोनीने अखेरच्या 4 चेंडूत 12 धावा करत विजय मिळवून दिला होता 
2012 मध्ये धोनीने अंतिम 4 चेंडूंमध्ये 12 धावा करत विजय मिळवून दिला होता. सध्या धोनीचा फॉर्म ही भारतासाठी चिंतेची बाब बनली आहे. पहिल्या सामन्यात धोनीने 51 धावा केल्या पण त्यासाठी 96 चेंडू खेळले. धोनीने अॅडिलेडमध्ये फिनिशर म्हणून करिअरच्या सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक खेळी केली आहे. अॅडिलेडमध्ये 2012 मध्ये भारताला विजय मिळाला होता. या मॅचमध्ये धोनीने अखेरच्या 4 चेंडूत 12 रन करून मॅचमध्ये विजय मिळवून दिला होता. 

 
18 सामन्यांत फक्त 4 वेळा विजयी 
7 वर्षांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियात एकूण 18 वनडे मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी फक्त 4 मध्ये भारताला विजय मिळाला आहे. 12 सामन्यांत भारताचा पराभव झाला आहे. एक मॅछ ड्रॉ तर एक टाय झाली होती. 

 

विजय शंकर, शुभमन गिलचा समावेश 
हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्या निलंबनानंतर विजय शंकर आणि गेल्या वर्ष अंडर-19 वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमचा भाग राहिलेला फलंदाज शुभमन गिलचा संघात समावेश करण्यात आला आहे. विजय शंकर दुसऱ्या वन डेच्या आधी ऑस्ट्रेलियात पोहोचणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...