आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला फैजपुरातून ४ रोजी सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातून फैजपूर येथून ४ ऑक्टोबरपासून जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण हे तिन्ही माजी मुख्यमंत्री जिल्ह्यात येणार आहेत, अशी माहिती मंगळवारी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. 


जनसंघर्ष यात्रेचा पहिला टप्पा ८ सप्टेंबरला संपून ४ ऑक्टोबरपासून जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला फैजपुरातून सुरुवात होत आहे. सकाळी १०.३० वाजता जनसंघर्ष यात्रेला शुभारंभ होऊन जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सजवलेल्या रथातून रॅली काढण्यात येईल. त्यानंतर बोदवड, भुसावळ, जळगाव या तिन्ही तालुक्यांत देखील जनसंघर्ष यात्रेची सभा आयोजन केली आहे. ५ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जळगावातून ही जनसंघर्ष यात्रा एरंडोलकडे रवाना होऊन येथे सकाळी ११ वाजता सभा होऊन पुढे पारोळा, अमळनेर येथून जनसंघर्ष यात्रेचा रथ पुढे धुळे जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने पेट्रोल-डिझेल दरवाढ, राफेल विमान आदी प्रश्नांना वाचा फोडून 'चौकीदारच चोर झाला' या राहुल गांधींच्या मताला या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने वाचा फोडण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी सांगितले. या वेळी कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी उपस्थित होते. दरम्यान, काॅंग्रेस कमिटीच्या झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्यांची माेठी उपस्थिती हाेती. 

 

जनसंघर्ष यात्रा नियोजनासाठी ब्लॉक अध्यक्षांची बैठक 
जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या नियोजनासाठी मंगळवारी दुपारी ४ वाजता काँग्रेस भवनात जिल्ह्यातील काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांच्या बैठक झाली. यात जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा ४ ऑक्टोबरपासून फैजपूर येथून सुरू होत आहे. तो यशस्वी करण्यासाठी नियाेजन करण्यात अाले. 


बैठकीला जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत जनसंघर्ष यात्रेविषयी नियोजनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. यात जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, प्रदेश प्रतिनिधी डी. जी. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी ब्लॉक अध्यक्षांना यात्रेसंदर्भात मार्गदर्शन केले. माजी आमदार शिरीष चौधरी, शहराध्यक्ष अर्जुन भंगाळे, दिलीप पाटील, सरचिटणीस अजबराव पाटील, शहराध्यक्ष श्याम तायडे, सेवादलाचे राजेश कोतवाल उपस्थित होते. 


यात्रेला १५ हजार लोक राहणार उपस्थित 
जनसंघर्ष यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे रथयात्रेदरम्यान फैजपूरच्या सभेला १५ हजार लोकांची उपस्थितीची शक्यता आहे. काँग्रेस सत्तेत यावी, अशी जनतेची इच्छा असल्याचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले. तर भाजपला जनता कंटाळली आहे. भाजपतील नेत्याने काँग्रेस संपवायला कमी प्रयत्न केले नाहीत. या नेत्याला मंत्रिपदाची हाव असून येणाऱ्या लोकसभा व विधानसेभेला जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल, असे प्रदेश प्रतिनिधी डी. जी. पाटील यांनी या वेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...