आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणार देशातील दुसरी खासगी रेल्वे, 17 जानेवारीला होणार शुभारंभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिली खासगी तेजस एक्सप्रेस लखनऊ-दिल्ली दरम्यान सुरु करण्यात आली. - Divya Marathi
पहिली खासगी तेजस एक्सप्रेस लखनऊ-दिल्ली दरम्यान सुरु करण्यात आली.
  • गुरुवार वगळता आठवड्यातील 6 दिवस चालणार नवीन तेजस एक्सप्रेस
  • सकाळी 9:30 वाजता अहमदाबादहून निघून, संध्याकाळी 4 वाजता मुंबईत पोहोचेल
  • मुंबई सेंट्रलहून 5:15 वाजता निघून, रात्री 11:30 वाजता अहमदाबादला पोहोचेल
  • पश्चिम रेल्वे विभागात धावणाऱ्या तेजसचे अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान 6 स्टॉप

नवी दिल्ली - देशातली दुसरी खासगी 'तेजस' रेल्वे मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) अंतर्गत चालवली जाईल. मुंबई-अहमदाबाद तेजसची सुरुवात 17 जानेवारी 2020 पासून होणार आहे. ही रेल्वे आठवड्यातील गुरुवार सोडून सहा दिवस धावणार आहे. लखनऊ आणि दिल्ली दरम्यान देशातील पहिल्या खासगी 'तेजस' रेल्वेला लोकांनी पसंत केले होते. जागतिक दर्जाच्या सुविधायुक्त असलेल्या रेल्वेला उशीर झाल्यानंतर प्रवाशांना भरपाई देण्याची तरतूद आहे. 
रेल्वे अधिकाऱ्यांद्वारे प्राप्त माहितीनुसार, 'तेजस' अहमदाबादहून सकाळी साडे नऊ वाजता निघेल आणि संध्याकाळी 4 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. मुंबईहून संध्याकाळी 5:15 वाजता रवाना होईल आणि रात्री 11:30 वाजता अहमदाबादला दाखल होईल. ही रेल्वे पश्चिम रेल्वे विभागांतर्गत धावेल. 



18 कोचसोबत धावणार नवीन 'तेजस''


या नवीन तेजस एक्सप्रेसमध्ये 18 कोच असलील. दरम्यान सुरुवातीला 12 कोच असणारी रेल्वे चालवण्यात येणार आहे. यानंतर कोचची संख्या वाढवली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी दावा केला की, प्रवाशांना रेल्वेत जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येतील. वातानुकूलीत असलेल्या या रेल्वेत प्रवासी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर श्रेणीत प्रवास करू शकतात. कोचमधील सीट्स आरामदायक बनवण्यात आल्या आहेत. यासोबत स्लाइडिंग कोच दरवाजा, ऑटोम्रटिक एंट्री आणि एक्झिट दरवाजे, पर्सनल रीडिंग लाइट, मोबाइल चार्गिंग प्वाइंट, अटेंडेंट कॉल बटन आणि बायो टॉयलेटची सुविधा आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. 



मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान 6 स्टॉप


नवीन तेजस ट्रेनला मुंबई ते अहमदाबाद प्रवासादरम्यान एकूण सहा स्टॉप देण्यात आले आहेत. अहमदाबादहून निघाल्यावर ही रेल्वे नडियाद, वडोदरा, भरूच, सूरत, वापी आणि बोरीवली स्थानकांवर थांबा घेत मुंबई सेंट्रलला येईल. 



लखनऊ-दिल्ली दरम्यान धावली पहिली खासगी तेजस


देशातली पहिली खासगी रेल्वे लखनऊ-दिल्ली दरम्यान 4 ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आली. आयआरसीटीसीमार्फत ही रेल्वे चालवण्यात येते. रेल्वेला उशीर झाल्यास प्रवाशांना भरपाई दिली जाते. एक तास उशीर झाल्यास 100 आणि दोन तास उशीर झाल्यावर 250 रूपये भरपाई देण्याची तरतूद आहे. 

बातम्या आणखी आहेत...