Home | Sports | From The Field | Second test / fourth Day: record of Anderson; team India defeats

दुसरी कसाेटी/ चाैथा दिवस : अँडरसनचा लाॅर्ड‌्सवर विक्रम; टीम इंडियाचा डावाने पराभव

वृत्तसंस्था | Update - Aug 13, 2018, 07:54 AM IST

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या एेतिहासिक लाॅर्ड््स मैदानावर यजमान इंग्लंडने रविवारी दुसऱ्या कसाेटीत पाहुण्या टीम इंडि

 • Second test / fourth Day: record of Anderson; team India defeats

  लंडन- क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या एेतिहासिक लाॅर्ड््स मैदानावर यजमान इंग्लंडने रविवारी दुसऱ्या कसाेटीत पाहुण्या टीम इंडियाला पराभूत केले. इंग्लंडने डाव अाणि १५९ धावांनी अापला धडाकेबाज विजय साजरा केला. जेम्स अँडरसन (४/२३) अाणि स्टुअर्ट ब्राॅडने (४/४४) धारदार गाेलंदाजी करताना दुसऱ्या डावात टीम इंडियाला १३० धावांवर गुंडाळले. या विजयासह यजमान इंग्लंडने पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने अाघाडी घेतली. अाता तिसरी कसाेटी १८ अाॅगस्टपासून रंगणार अाहे.


  अँडरसनने रचला इतिहास
  फाॅर्मात असलेल्या वेगवान गाेलंदाज जेम्स अँडरसनने लाॅर्ड््स मैदानावर इतिहास रचला. त्याने भारताविरुद्ध दुसऱ्या कसाेटीच्या चाैथ्या दिवशी दुसऱ्या डावात सलामीवीर मुरली विजयला शून्यावर बाद केले. यासह त्याने या मैदानावर अापले कसाेटी बळींचे शतक साजरे केले. त्याने मुरलीच्या रूपाने या मैदानावर अापली शंभरावी कसाेटी विकेट घेतली. अशा प्रकारे या मैदानावर विकेटचे शतक साजरे करणारा जेम्स अँडरसन हा जगातील पहिला गाेलंदाज ठरला.

  टीम इंडियाने १३० धावांत गुंडाळला गाशा
  भारताला दुसऱ्या डावातही सुमार फलंदाजीचा फटका बसला. त्यामुळे संघाला निराशेला सामाेरे जावे लागले. त्यामुळे भारताने दुसऱ्या डावात ४७ षटकांत अवघ्या १३० धावांवर अापला गाशा गुंडाळला.


  अँडरसन ठरला दुसरा गाेलंदाज
  एका मैदानावर सर्वाधिक बळी घेणारा जेम्स अँडरसन हा जगातील दुसरा गाेलंदाज ठरला. यामध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधनरचा दबदबा अाहे. त्याने काेलंबाे (१६६), कँडी (११७) अाणि गाॅलच्या (१११) मैदानावर बळीचे शतके केल. यात हेराथ (गाॅल, ९९ बळी) तिसऱ्या स्थानी अाहे. एकाच मैदानावर सर्वाधिक बळींचा विक्रम अनिल कुंबळेने (५८) फिराेजशहा काेटलावर केला.

Trending