क्रिकेट / दुसरी कसाेटी : भारताचा सलग कसोटी विजयाचा चौकार, वेस्ट इंडिजवर २५७ धावांनी विजय मिळवून पराक्रम

विंडीजचा दुसरा डाव २१० धावांवर गुंडाळला, शमी-जडेजाने निम्मा संघ पाठवला तंबूत

Sep 17,2019 02:04:13 PM IST

किंग्जस्टन - टीम इंडियाने विंडीजविरुद्ध कसाेटी मालिका जिंकली आहे. भारताच्या ४६८ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ केवळ २१० धावात गुंडाळला. ब्रुक्सने अर्धशतक झळकावून थोडाफार संघर्ष केला. मात्र इतर फलंदाजांनी नांगी टाकल्याने विंडीजला मायदेशात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून यजमानांचा निम्मा संघ गारद केला. या विजयामुळेे भारताने सलग चार कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला.


तत्पूर्वी भारताने आपला दुसरा डाव ४ बाद १६८ धावांवर घाेषित केला. यात हनुमा विहारीने (नाबाद ५३) अर्धशतकाचे माेलाचे याेगदान दिले. याच अर्धशतकाच्या बळावर भारताने विंडीजसमाेर ४६८ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले. भारताने पहिल्या डावात ४१६ आणि दुसऱ्या डावात १६८ धावा काढल्या.


आव्हानाचा पाठलाग करताना विंडीज संघाची निराशाजनक सुरुवात झाली. ठरावीक अंतराने त्यांनी गडी गमावले. भारताने यापूर्वी २०१३ आणि २०१६ दरम्यान सलग तीन कसाेटी जिंकल्या हाेत्या. या विजयामुळे भारताने दाैऱ्यात सलग तिन्ही मालिका जिंकून आपले श्रेष्ठत्त्व सिद्ध केले आहे.

ऋषभचे झेलचे अर्धशतक; धाेनीवर मात

यष्टिरक्षक ऋषभ पंतने दुसऱ्या डावात ब्राव्हाेचा झेल घेतला. यासह त्याने कसाेटीत ५० झेल पूर्ण केले. त्याने ११ व्या कसाेटीतच हा पल्ला गाठला. यासह त्याने धाेनीला मागे टाकले. धाेनीने १५ कसाेटीत हा पराक्रम गाजवला आहे. कसाेटीत सर्वाधिक ५० झेलचे संयुक्त रेकाॅर्ड आफ्रिकेच्या बाऊचर, इंग्लंडच्या बैयरस्ट्राे व आॅस्ट्रेलियाच्या टीम पेनच्या नावे आहे. या तिघांनी १० कसाेटीतच हे यश मिळवले. आता ऋषभला अव्वल कामगिरीची नाेंद करता आली आहे.

X