आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Second Underwater Nuclear Missile To Be Tested On November 8, Capable Of Hitting 3500 Km

दुसऱ्या अंडरवॉटर न्यूक्लियर मिसाइलचे परीक्षण 8 नोव्हेंबरला होणार, 3500 किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डीआरडीओने के-4 पुर्वी 700 किमी मारक-क्षमता असलेली बीओ-5 अंडरवॉटर मिसाइल बनवली होती
  • के-4 चे परीक्षण 8 नोव्हेंबरला विशाखापट्टनमच्या किनाऱ्यावर समद्रात केले जाईल
  • डीआरडीओने मिसाइलला न्यूक्लियर आर्म्ड सबमरीन आयएनएस अरिहंतसाठी बनवले

हैदराबाद- डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन(डीआरडीओ) 8 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनमच्या किनाऱ्यावर के-4 न्यूक्लियर मिसाइलचे परीक्षण करणार आहे. हे परीक्षण पाण्याच्या आत बनलेल्या प्लॅटफॉर्मवरुन केले जाईल. या मिसाइलची 3500 किमीलोमीटर दुरवरील शत्रुला मारण्याची क्षमता आहे. ही भारताची दुसरी अंडरवॉटर मिसाइल आहे. यापुर्वी 700 किलोमीटर मारक-क्षमता असलेली बीओ-5 मिसाइल भारताने बनवली आहे.


के-4 देशातील दुसरी अंडरवॉटर मिसाइल आहे. याआधी 700 किमी मारक-क्षमता असलेली बीओ-5 मिसाइल तयार केली आहे. सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, के-4 चे परीक्षण मागील महिन्यातच करणार होते, पण काही तांत्रिक कारणास्तव याला रद्द करण्यात आले होते. डीआरडीओ पुढील काही दिवसात अग्नि-3 आणि ब्रम्होस मिसाइलचे परीक्षण करणार आहे.

न्यूक्लियर आर्म्ड सबमरीन असलेला भारत जगातील सहावा देश
 
देशात बनलेली पहिली न्यूक्लियर आर्म्ड सबमरीन आयएनएस अरिहंतला ऑगस्ट 2016 मध्ये नेव्हीमध्ये सामील करण्यात आले होते. न्यूक्लियर आर्म्ड सबमरीन असलेला भारत जगातील सहावा देश आहे. भारताशिवाय अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, रशिया आणि चीनकडे अशा सबमरीन आहेत.

बातम्या आणखी आहेत...