आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी झोपताच समलैंगिक प्रियकरासोबत चॅटिंग करायचा पती, गुपित उघडताच रचला हत्येचा षडयंत्र; आता झाली ही शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मितेश पटेलला (37) येथील कोर्टाने पत्नी जेसिका (34) च्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मितेश आणि त्याचा बॉयफ्रेंड अमित या दोघांची भेट समलैंगिक डेटिंग अॅप ग्राइंडरच्या माध्यमातून झाली होती. जेसिकाची हत्या करून त्याने आपल्या ऑस्ट्रेलियातील प्रियकरासोबत राहण्याचा कट रचला होता. याच वर्षाच्या सुरुवातीला कोर्टाने त्याला हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते.


- भारतीय वंशाचे मितेश आणि जेसिका गेल्या काही वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहत होते. तीन वर्षांपासून ते आपल्या घराजवळच एक फार्मसी स्टोअर चालवत होते. सर्व काही सुरळीत होते. परंतु, मितेशने आपण समलैंगिक असल्याची गोष्ट पत्नी आणि कुटुंबियांपासून लपवून ठेवली. 
- काही वर्षांपूर्वीच त्याची गे डेटिंग अॅप ग्राइंडरवर ऑस्ट्रेलियातील डॉ. अमितशी भेट झाली. दोघांमध्ये संवाद वाढत गेला. पत्नी झोपताच मितेश आपला प्रियकर अमितसोबत चॅटिंग करायचा. यानंतर त्याने फार्मसी स्टोअरमध्ये सुद्धा आपल्या प्रियकराशी बोलण्यास सुरुवात केली. त्यांचे अश्लील संभाषण तेथे काम करणाऱ्यांपैकी अनेकांनी ऐकले आणि ही गोष्ट पत्नी जेसिकाला कळाली. 
- आपला पती एक छुपा समलैंगिक असल्याचा पत्ता लागल्यानंतर दोघांमध्ये भांडणे झाली. कोर्टात सादर करण्यात आलेल्या पुराव्यानुसार यानंतर मितेशने आपल्या बॉयफ्रेंडला एक मेसेज पाठवला होता. त्यामध्ये पत्नी जेसिकाचे काही दिवस उरले असे तो बोलला होता. त्या दिवसापासूनच त्याने जेसिकाच्या हत्येचा कट रचण्यास सुरुवात केली. 


असा रचला हत्येचा कट
कोर्टात पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये मितेशने हत्येसाठी केलेला गुगल सर्चचा देखील समावेश आहे. पत्नी जेसिकाला ठार मारण्यासाठी त्याने इन्सुलीनच्या हायडोजचा वापर कसा करता येईल यावर रिसर्च केला होता. धोक्याने इन्सुलीन दिल्यानंतर मितेशने तिला एका मोठ्या प्लास्टिक बॅगेत कोंबले. याच दरम्यान गुदमरून तिचा जीव गेला. यानंतर स्वतः पोलिसांनी घरी बोलावून पत्नीचा खून झाला अशी तक्रार केली होती. मितेशचे रेकॉर्ड चेक केले तेव्हा, त्याने आपल्या पत्नीच्या नावे 20 लाख ब्रिटिश पाउंड अर्थात जवळपास 20 कोटी रुपयांचा विमा केला होता असे उघडकीस आले. ही संपूर्ण रक्कम घेऊन तो आपल्या प्रियकरासोबत स्थायिक होणार होता.

 

बातम्या आणखी आहेत...